महाराष्ट्रावर अस्मानी संकट ओढावलं आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाने धुमशान घातलं आहे. हातातोंडाशी आलेलं पिक पाण्यात गेलं आहे. लाखो शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं असून घरं पाण्याखाली गेली. जगाच्या पोशिंद्या बळीराजाला मदतासाठी न्यूज18 लोकमतने आवाहन केलं आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार शेतकऱ्यांना मदत पाठवू शकता. ही मदत थेट मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा होणार आहे. त्यामुळे व्हिडीओमध्ये दिललेल्या बँक खात्यावरच पैसे पाठवावे. तुमची छोटीशी मदत शेतकऱ्यांना धीर देणारी असेल. - मुख्यमंत्री सहाय्यता निधी - बँक - स्टेट बँक ऑफ इंडिया, मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई. - अकाऊंट नंबर - 10972433751 IFSC कोड - SBIN0000300