
कालच शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची सभा झाली. त्यात मराठी भाषेचा उल्लेख झालाच. पण आज तीन हात नाका येथे इंग्रजी बॅनर लावल्याने ठाकरे बंधू ट्रोल झाले आहेत. तेव्हा मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले,"एकच बॅनर इंग्रजीमध्ये लावला आहे. बाकीचे ९९ टक्के बॅनर हे माराठीतच लावले आहेत. तो एक बॅनर परिभाषिकांसाठी लावला आहे." त्यावरुन मनसे आणि ठाकरे गट विरोधकांकडून ट्रोल झाला आहे.
Last Updated: Jan 12, 2026, 17:38 ISTपत्रकारांशी बोलताना आरपीआयचे मंत्री रामदास आठवले म्हणाले, "मुंबई पालिकेत राज ठाकरेंना फायदा होणार नाही. कारण ६० टक्के लोकं परप्रांतिय आणि ४० टक्के मराठी वोटर आहेत. राज ठाकरेंचं पानीपत होणार आहे. त्यामुळे आम्ही बीजेपी, शिवसेना महायुती सोबत येऊन लढत आहोत. त्यामुळे पनवेल आणि मुंबई महानगरपालिका आम्ही जिंकणार आहोत."
Last Updated: Jan 12, 2026, 16:57 ISTबीड : शेतीत कीड आणि रोग नियंत्रणासाठी फवारणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. मात्र फवारणीची योग्य वेळ चुकल्यास शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागू शकते. कृषी तज्ज्ञांच्या मते, पिकांच्या वाढीच्या ठराविक अवस्थेत आणि अनुकूल हवामानात फवारणी करणे आवश्यक असते. वेळेवर उपाय न केल्यास किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आणि त्याचा थेट फटका उत्पादनावर बसतो. याबद्दलच कृषी अभ्यासक महादेव बिक्कड यांनी माहिती दिली आहे
Last Updated: Jan 12, 2026, 16:45 ISTभाजप आमदार महेश लांडगे यांनी Excusive मुलाखतीमध्ये बोलताना ते म्हणाले, " 2014 च्या अगोदरची BJP नेत्यांच्या वरील अजित दादांची भाषणं काढा.त्यानंतर त्यांना विचारा की तुम्ही भारतीय जनता पार्टी का निवडली ? त्यांनी देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले होते. ते आता का आवडायला लागले ?"
Last Updated: Jan 12, 2026, 16:30 ISTभाजप आमदार महेश लांडगे यांनी Excusive मुलाखतीमध्ये बोलताना ते म्हणाले, " महाराष्ट्राचे दादा २९ पालिकांच्या निवडणुका सोडून भोसरीत पुर्ण टीम येऊन का बसलेत? गल्लीतल्या दादांना एवढं सिरियस घ्यायची गरज नाही."
Last Updated: Jan 12, 2026, 16:09 IST