
महाविकास आघाडीमध्ये (मविआ) जागावाटपाचा संघर्ष आता टोकला पोहोचण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांसाठी शिवसेना (यूबीटी) पक्षाने राज्यसभा आणि विधान परिषद या दोन्ही महत्त्वाच्या जागांवर दावा ठोकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या दुहेरी मागणीमुळे मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची (शरद पवार गट) मोठी कोंडी झाली आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आपले पत्ते अद्याप उघडले नाहीत. शरद पवार यांच्या उमेदवारीवर ठाकरे गट सहमत आहे.