
'सडक सुरक्षा अभियान 2026' या कार्यक्रमात अनेक सेलीब्रेटींनी हजेरी लावली होती.तेव्हा मंत्री नितिन गडकरी म्हणाले,"अपघातात कुणी मदत केली तर त्यांना पोलीस चौकशीसाठी बोलवायचे त्यांना त्रास द्यायचे.त्यामुळे लोकांनी मदत करणच सोडून दिले.मग आम्ही एक कायदा केला की मदत करणाऱ्यांवर कोणती केस होणार नाही.त्यानंतर आम्ही एक योजना राबवली जो अपघात झालेल्या व्यक्तीला आणेल त्याला राहवीर योजना मधून 25,000 रुपये बक्षीस दिले जाईल.एक फॉर्म आहे तो भरल्यानंतर रुग्णाला १ लाख रुपये उपचारासाठी मिळतात."