
मुंबई : मुंबई एक असे शहर ज्यात विविध जाती जमातीचे लोक एकत्र राहत असलेले पाहायला मिळतात. या स्वप्न नगरीत महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यातूनही अनेक लोक येऊन आपल्या संस्कृतीचे प्रदर्शन करतात. यामुळेच मुंबईत अनेक प्रकारचे खाद्यपदार्थही खायला मिळतात. घाटकोपरमधील खाऊ गल्ली हे ठिकाण याचे एक उत्तम उदाहरण आहे. या ठिकाणी एखाद्या हॉटेलमध्ये मिळणार नाही तेवढे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य प्रकार उपलब्ध आहेत. याच खाऊ गल्लीमध्ये राजस्थानमधील खिचिया पापड खायला मिळत आहे.
Last Updated: November 17, 2025, 14:23 ISTजालना: भल्या पहाटे आपल्या दारावर आलेले गोंधळी तुम्हाला नक्कीच आठवत असतील. हल्ली हे चित्र दुर्मिळ होत चाललंय. मात्र जालन्यातील उगले कुटुंब मागील अनेक वर्षांपासून गोंधळी कला जोपासण्याचे काम करतंय. संबळाच्या तालावर सुरेल आवाजात लोकदेवतांची गाणी म्हणून ते आपली उपजीविका करतात. मात्र हल्लीच्या इंटरनेटच्या काळामध्ये त्यांच्या या कलेला राजश्रय मिळेनासा झालाय. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिक देखील त्यांच्या यात्रेला भाव देत नाहीत. यामुळेच या कलाकारांवर उपासमारीची वेळ आलीये.
Last Updated: November 17, 2025, 18:25 ISTछत्रपती संभाजीनगर : आपल्या देशात अनेक रूढी आणि परंपरा आजही पाळल्या जातात. अनेक गावात वेगवगेळ्या आश्या रूढी आणि परंपरा या चालत आलेल्या असतात. या विषयी आपल्या सर्वाना जाणून घेण्याची ही ईच्छा असतेच. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असं एक गाव आहे या गावामध्ये मुला-मुलींचे लग्न गावात होत नाहीत. या गावातील मुला-मुलींचे लग्न गावाच्या बाहेर लावली जातात. शिवाय गावातील घरावर दुसरा मजला चढवला जात नाही. शेकडो वर्षांची ही परंपरा आजही कायम आहे.
Last Updated: November 17, 2025, 17:38 ISTछत्रपती संभाजीनगर: हिवाळा ऋतू सुरू झालेला आहे. हिवाळ्यामध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवले जातात. त्यामध्ये कोणी डिंकाचे लाडू, ड्रायफ्रूटचे लाडू किंवा मेथीचे लाडू अशा वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवत असतात. हिवाळ्यामध्ये खास करून हे जवसाचे आणि ड्रायफ्रूटचे लाडू तयार करू शकता. अतिशय झटपट असे हे लाडू बनवून तयार होतात. त्याची रेसिपी सांगितलेली आहे डॉक्टर प्रज्ञा तल्हार यांनी.
Last Updated: November 17, 2025, 17:07 ISTपुणे: हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक लोकं आपली तब्येत व्यवस्थित ठेवण्यासाठी विशेष मेहनत घेत असतात. थंडीच्या दिवसांमध्ये आपलं शरीर मोठ्या प्रमाणावर ऊर्जा खर्च करते. त्यामुळे भूकही मोठ्या प्रमाणावर लागते. ऊर्जा अधिक प्रमाणावर खर्च होत असल्यामुळे खाल्लेले अन्नही पचवते. बाहेर थंडीचा कडाका वाढत असताना शरीराचे पोषण होईल असा ब्रेकफास्ट आपण खायला हवा. खीर हा थंडीच्या दिवसांत खाण्यासाठी अतिशय उत्तम पदार्थ असून या काळात पौष्टिक खीर खायला हवी.
Last Updated: November 17, 2025, 16:31 ISTसोलापूर : काकडी लागवडीतून सुद्धा अधिकाधिक उत्पन्न घेता येते. हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी गावातील शेतकरी महादेव श्रीधर गायकवाड यांनी सिद्ध करून दाखवले आहे. एका एकरात दोन महिन्यांपूर्वी काकडीची लागवड होती. तर या काकडीच्या विक्रीतून दोन महिन्यात 80 ते 1 लाख रुपयांचे उत्पन्न महादेव गायकवाड यांना मिळाले आहे.
Last Updated: November 17, 2025, 16:01 IST