
पुणे: दिवसभर उन्हातान्हात बसून दगडांना फोडून त्यापासून तयार करण्यात आलेल्या वस्तूंना बाजारात काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणत मागणी होती. पण अलीकडे त्या वस्तूंचा वापर खूप कमी झाला आहे. त्यामुळे या लोकांच्या रोजगारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. तरी देखील हे लोक या वस्तू रात्रं- दिवस मेहनत करून बनवत असतात. एक वस्तू तयार करण्यासाठी त्याचा अख्खा दिवस जातो. दगड गोळा करण्यापासून, त्याला हाताने कोरून आकार देण्यापर्यंत आणि तयार वस्तू बाजारात विकण्यापर्यंत. एवढी मेहनत करून सुद्धा त्यांना योग्य मोबदला मिळत नाही. याविषयी सरस्वती रोदरे यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
Last Updated: November 25, 2025, 14:03 ISTसोलापूर: शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी पशुपालन कडे वळत आहे आणि याचा फायदा देखील शेतकऱ्यांना मिळत असल्याचं दिसत आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल गावातील शेतकरी अर्जुन गवळी यांनी दोन एकर शेती सांभाळत गिर गाय पालन करत आहे,तर गिर गायीच्या दूध, तूप आणि शेणखत विक्रीतून ते महिन्याला 3 ते 4 लाख रुपयांची कमाई करत आहे.
Last Updated: November 25, 2025, 15:12 ISTघरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलेल्या नाशिकच्या श्रीकांत खरात या तरुणाने मात्र हार मानली नाही. जीवनातील संघर्षांना तोंड देत या तरुणाने 'खरात बंधू' नावाने स्वतःचा खिमा पाव सेंटरचा व्यवसाय सुरू केला आहे. नोकरीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा स्वतःच्या व्यवसायातून अधिक पैसे कमावत असल्याचे या युवा उद्योजकाने 'लोकल १८'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. चला, त्याची ही प्रेरणादायी व्यावसायिक कहाणी जाणून घेऊया.
Last Updated: November 25, 2025, 14:36 ISTदादरच्या नेहमीच गजबजलेल्या शिवाजी नाट्यमंदिर परिसरात एका छोट्याशा स्टॉलने चार दशकांहून अधिक काळ आपली ओळख जपली आहे. घरगुती वस्तूंची विक्री करणारे आत्माराम नाईक हे आजोबा साधेपणाने पण मनापासून व्यवसाय करत असल्यामुळे स्थानिक रहिवाशांचा त्यांच्यावर विशेष विश्वास आहे. रोजच्या धकाधकीत त्यांच्या स्टॉलसमोर थोडा वेळ थांबून आपल्या गरजेच्या वस्तू घेणाऱ्या ग्राहकांची सततची रेलचेल दिवसभर दिसून येते.
Last Updated: November 25, 2025, 13:33 ISTथंडीची चाहूल लागताच अनेक लोकं हिवाळ्यामध्ये गरमागरम पदार्थांकडे वळताना दिसत आहेत. यामध्ये सर्वाधिक लोकप्रियता मिळत आहे ते हेल्दी टोमॅटो सूप. कमी वेळात तयार होणारी आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर अशी ही रेसिपी सध्या अनेकांच्या पसंतीस उतरली आहे.
Last Updated: November 25, 2025, 13:03 IST