
विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात जाहीर सभा झाली. या सभेतून पंतप्रधानांनी सरकारने पुण्यासाठी कोणते प्रकल्प राबवले आणि कोणती कामं केली याचा पाढाच वाचून दाखवला. तसंच पुण्याच्या विकासासाठी गुंतवणूक आणि इंडस्ट्रीची गरज आहे ती आम्ही पूर्ण करू, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे.