TRENDING:

Video: दवाखान्यात जाण्याची गरज नाही, गाडीतच होतोय रुग्ण खणखणीत! नेमका प्रकार काय?

पुणे
Last Updated: Mar 03, 2026, 12:49 IST

पुणे : मागील काही वर्षांपासून महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला घरखर्च भागवणेही कठीण झाले आहे. अशातच आजारपण आले तर रुग्णालयाचा खर्च कसा भागवायचा, हा मोठा प्रश्न उभा राहतो. किती पैसे लागतील याचा नेम नसल्याने अनेक जण उपचार घ्यायलाही घाबरतात. हीच अडचण लक्षात घेऊन पुण्यातील उमेश चव्हाण यांनी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. ते अवघ्या पाच रुपयांत आरोग्य सेवा देत आहेत. यामुळे गरजू आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना मोठा दिलासा मिळत आहे. या उपक्रमाविषयी माहिती रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक उमेश चव्हाण यांनी लोकल 18 ला दिली आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
Video: दवाखान्यात जाण्याची गरज नाही, गाडीतच होतोय रुग्ण खणखणीत! नेमका प्रकार काय?
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल