सोलापूर - सोलापूर शहरातील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील विद्यार्थ्यांनी सोलार पॅनल क्लिनिंग डिवाइस बनवले असून याचा फायदा सौर ऊर्जेवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे. ही कल्पना कशी सुचली आणि हा डिवाइस कसा कार्य करतो यासंदर्भात अधिक माहिती विद्यार्थी दीपक सदाफुले यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.