
सोलापूर - महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या खाद्य संस्कृती पाहायला मिळते. सोलापूर शहरातील विजापूर वेसमध्ये असलेल्या रूपाभवानी मटन भाजनालयमध्ये नेहमीच गर्दी मटन आणि चिकन पासून तयार होणाऱ्या शिक कढई खाण्यासाठी खवय्यांची असते. तर या व्यवसायातून महिन्याला हॉटेल चालक किसन कांबळे 1 लाख रुपयांची उलाढाल करत आहे. या संदर्भात अधिक माहिती हॉटेलचे मालक किसन कांबळे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
Last Updated: October 28, 2025, 15:40 ISTकल्याण : चिकन खाण्याची अनेकांना आवड असते. हिरव्या पेस्टपासून बनवलेली एक चवदार चिकन डिश आहे, जी रोटी किंवा भातासोबत खाल्ले जाते. हरियाली चिकन किंवा हिरवे चिकन म्हणूनही ओळखले जाते आणि याच्या अनेक पद्धती आहेत, जसे की हैदराबादी ग्रीन चिकन किंवा थाई ग्रीन करी. यात चिकनला हिरव्या मसाल्यांच्या पेस्टसोबत शिजवले जाते, ज्यामुळे त्याला एक वेगळी चव आणि सुगंध येतो. आज आपण हिरव्या मिरच्या पेस्ट पासून ग्रीन चिकन कसा बनवायचा बघणार आहोत.
Last Updated: December 13, 2025, 15:07 ISTनाशिक: उच्च शिक्षण घेऊनही नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची जिद्द नाशिकमधील एका तरुण मेकॅनिकल इंजिनिअरने दाखवली आहे. अभिषेक काकड या तरुणाने त्याची आई मंगल काकड यांच्यासोबत मिळून गो-मंगल डेअरी फार्मच्या माध्यमातून दूध उत्पादनाच्या व्यवसायात मोठे यश मिळवले आहे. केवळ एका गायीपासून सुरू केलेला त्यांचा हा प्रवास आज 20 ते 25 गायींपर्यंत पोहोचला असून, ते महिन्याला तब्बल 5 ते 6 लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत.
Last Updated: December 13, 2025, 14:35 ISTछत्रपती संभाजीनगर : तब्बल 50 वर्षानंतर आज 12 डिसेंबर रोजी शोले हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित झाला आहे. 4 के रिस्टोरेशन, मूळ उत्कर्षबिंदू आणि हटवलेले दोन सीन पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये विशेष दिसून आली. काहींना जुन्या आठवणी जाग्या झाल्या तर तरुणांना पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर शोले अनुभवल्याचा अनुभव अविस्मरणीय वाटला. तर छत्रपती संभाजीनगर शहरातील चित्रपट प्रेमींना शोले द फायनल कट हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांची काय पहिली प्रतिक्रिया आहे पाहुयात.
Last Updated: December 13, 2025, 14:42 ISTवसई येथील वर्तक हॉलमध्ये ‘यूनिवर्सल ट्रेड एक्सपो’ अंतर्गत ‘श्री सखी एक्सहिबिशन’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 11 डिसेंबरपासून 14 डिसेंबर 2025 पर्यंत आहे. दररोज सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. ग्राहकांसाठी ही एक सुवर्णसंधी असून फॅशन, लाइफस्टाइल, हँडक्राफ्टेड आणि पारंपरिक ते ट्रेंडी वस्तूंचा उत्कृष्ट संगम येथे पाहायला मिळणार आहे.
Last Updated: December 13, 2025, 13:32 ISTमुंबई : हलके-फुलके पण चविष्ट काहीतरी खायची इच्छा झाली की मनात सर्वात पहिले आठवते ते म्हणजे दही तडका आलू. घरगुती चव, सुगंधी तडका आणि थंडगार दही यांचा अफलातून मेळ असलेली ही रेसिपी चवीला जितकी अप्रतिम तितकीच बनवायला अतिशय सोपी आहे. कमी साहित्य, साधी पद्धत आणि फक्त काही मिनिटांत तयार होणारा हा पदार्थ अगदी नवशिक्यांनाही सहज जमतो. तर चला रेसिपी पाहूया.
Last Updated: December 11, 2025, 20:17 IST