
सोलापूर : पदवीधरपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे शहराकडे धाव न घेता सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी गावातील शेतकरी तानाजी हळदे यांनी एका एकरात गुलाबाची शेती केली आहे. यासाठी त्यांना 60 ते 70 हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे. गुलाबाची लागवड करून चार वर्षे झाले असून आतापर्यंत 12 लाख रुपयांचे उत्पन्न तानाजी हळदे यांनी घेतले आहे. या संदर्भात अधिक माहिती शेतकरी तानाजी हळदे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
Last Updated: December 03, 2025, 13:45 ISTमुंबई : मुंबईच्या वेगवान जीवनशैलीत कोकणाची माती, सुगंध आणि परंपरा जपणारे एक ठिकाण आजही दादरमध्ये अविरत उभे आहे. गेली पन्नास वर्षांहून अधिक काळ गजानन साळवी काका आपल्या छोट्याशा स्टॉलमधून मुंबईकरांना कोकणाची अस्सल चव चाखवत आहेत. बदलत्या काळात कितीही आधुनिक खाद्यसंस्कृती आली तरी साळवी काकांच्या स्टॉलसमोर उभे राहिल्यावर घरगुती कोकणी चवीचा मोह टाळणे अशक्यच ठरते.
Last Updated: December 03, 2025, 14:04 ISTमटणावर ताव मारायचं म्हटलं की, झणझणीत मटण, नाका तोंडातून पाणी आले पाहिजे. तसा योग बऱ्याच हळदी समारंभात पार्टीत अन्य सोहळ्यामध्ये किंवा जत्रेमध्ये नक्कीच येतो. आणि मटण प्रेमी असाल तर प्रश्नच मिटला अशाच मटण प्रेमी आणि खवय्येगिरींसाठी आम्ही घेऊन आलोय खास आगरी पद्धतीतले झणझणीत मसालेदार मटण. ज्या मटणाची चव आपण हळदी लग्नात नक्कीच बघतो. त्यामुळे काही मटणप्रेमी नक्कीच मटण खाण्यासाठी या कार्यक्रमात आवर्जून बघायला मिळतात. चला त्याच पद्धतीतलं सेम स्टाईलचं मटण आपण आज बनवणार आहोत.
Last Updated: December 03, 2025, 13:14 ISTनोकरी सुटल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेलेल्या प्रशांत सोनवणे या तरुणाने आता स्वतःचा पाणीपुरू व्यवसाय सुरू करून पुन्हा नव्याने सुरवात केली आहे. जिद्द आणि चिकाटी बाळगून या तरुणाने आज दर महिन्याला 60 ते 70 हजारांची कमाई करणारा पाणीपुरी व्यवसाय यशस्वीरीत्या सुरू केला आहे. जीवनात येणाऱ्या संघर्षांवर वेळोवेळी मात करत पुढे कसे जायचे, हे या तरुणाने आजच्या युवा पिढीला शिकवले आहे. 'लोकल 18' च्या माध्यमातून आपण आज या नव्याने सुरू केलेल्या व्यवसायाची प्रेरणादायी कहाणी जाणून घेणार आहोत.
Last Updated: December 02, 2025, 14:29 ISTमुंबई: 22 वर्षांची प्रणाली व्हावाळ ही तरुणी फॅशन डिझाईनचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी करत होती. पण काही काळानंतर तिला जाणवलं की तिच्या हातातही आणि तिच्या आईच्या हातातही एक सुंदर कला आहे. फॅब्रिकपासून ज्वेलरी तयार करण्याची. अनेक वर्ष आईने या कलेवर घर सांभाळलं, आणि हीच कला स्वतःकडेही आहे हे लक्षात आल्यावर प्रणालीने मोठा निर्णय घेतला. नोकरी सोडून तिने स्वतःचा फॅब्रिक ज्वेलरी व्यवसाय सुरू केला.
Last Updated: December 02, 2025, 14:04 IST