अयोध्या : आज देशभरात मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी होतेय. यंदा अयोध्येत राममंदिर स्थापनेनंतर पहिल्यांदा रामजन्मोत्सव साजरा होतोय. रामलल्लावर सूर्यतिलक सोहळा पार पडतोय. सोहळ्यादरम्यान भक्तांना रामलल्लाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येतंय. मंदिर संस्थानाद्वारे 100 LED आणि सरकारतर्फे लावलेल्या 40 LED स्क्रिनवर सूर्यतिलक दाखवला जातोय. 4 मिनिटांपर्यंत सूर्यतिलक सोहळा रंगणार आहे. (व्हिडीओ सौजन्य - डीडी न्यूज)