
अजित मांढरे, प्रतिनिधी, ठाणे : महापालिका निवडणुकीसाठी तिकीट वाटपाची डेडलाईन आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. अशातच ठाण्यात काँग्रेस पक्षात तिकीट वाटपावरून हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. अवघ्या १ दिवस उरले असताना आज काँग्रेस पक्षाच्या वतीने AB फॉर्म ठाण्यातील काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयावर वाटप करत असताना काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आपआपसामध्ये भिडले.
Last Updated: Dec 29, 2025, 23:57 ISTठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना वॉर्ड क्रमांक 199 मधून उमेदवारी जाहीर झाली. त्या म्हणाल्या, "आता बऱ्यापैकी सगळ्यांना फॉर्म दिले गेले आहेत आणि मलाही मिळाला आहे. लढाई अटीतटीची, निक्रीची आहे. शिवसैनिक, मनसैनिक, मतदार आमच्यासोबत आहेत त्यांच्या जीवावर ही निवडणुक आम्ही लढणार आहोत. पण शेवट हा गोड झाला."
Last Updated: Dec 29, 2025, 21:42 ISTयुद्ध सुरु होण्याआधीच शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांनी अचानक पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे हा मोठा धक्का शरद पवार राष्ट्रवादी पक्षाला मानावा लागणार आहे. "त्या पक्षात असताना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही,अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे हा निर्णय मला घ्यावा लागला" असं त्यांनी पक्ष सोडण्याचं कारण सांगितलं
Last Updated: Dec 29, 2025, 21:17 ISTपुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडली आहे. दोन्ही राष्ट्रवादी आपापल्या चिन्हावर लढणार. तर कार्यकर्त्यांसाठी एकत्र निवडूणक लढणार असल्याची रोहित पवारांची माहिती.
Last Updated: Dec 29, 2025, 20:59 ISTठाकरे बंधूंची युती झाल्यावर मनसेचा पहिलाच मेळावा पार पडला. तेव्हा राज ठाकरेंनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. ते म्हणाले, "महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी मुंबई महत्वाची आहे, त्यामुळे आपल्याला मुंबई वाचवायची आहे.निवडणुकीला एकजुटीनं सामोरं जा, मुंबई वाचली पाहिजे, त्यासाठी संकटं नीट ओळखा."
Last Updated: Dec 29, 2025, 20:29 IST