TRENDING:

अमेरिकेत मोठा दहशतवादी हल्ला! नव वर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या लोकांवर गाडी चढवली, १२ जणांचा मृत्यू

Last Updated:

अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्समध्ये एक भीषण अपघात झाला आहे. येथे भरधाव वेगात एका ट्रकने गर्दीला धडक दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
न्यू ऑर्लिन्स: अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्समध्ये एक भीषण अपघात झाला आहे. येथे भरधाव वेगात एका ट्रकने गर्दीला धडक दिली. नववर्षानिमित्त येथे लोक आनंदोत्सव साजरा करत होते. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे 3.15च्या सुमारास बोरबॉन स्ट्रीट आणि इबर्विलेच्या चौकावर घडली. हे ठिकाण नाइटलाइफ आणि अशा गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे.
News18
News18
advertisement

हाती आलेल्या माहितीनुसार ट्रकमधून खाली उतरताच चालकाने जमावावर गोळीबार सुरू केला. घटनास्थळावरून प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये लोक रस्त्यावर दिसत आहेत आणि गोळीबाराचा आवाज ऐकू येत आहे. जखमी लोक रस्त्यावर दिसतात. यात अनेकांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, न्यू ऑर्लिन्स पोलिसांनीही संशयितावर गोळीबार केला. घटनेनंतर जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.

advertisement

ऑर्लिन्समध्ये आपत्कालीन परिस्थिती

advertisement

अपघात आणि गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून, घटनास्थळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. व्हिडिओ आणि फोटो या भागात पोलिसांच्या गाड्या, रुग्णवाहिका आणि कोरोनर ऑफिसची वाहने दाखवतात, जिथे स्थानिक अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि संशयिताला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

मराठी बातम्या/विदेश/
अमेरिकेत मोठा दहशतवादी हल्ला! नव वर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या लोकांवर गाडी चढवली, १२ जणांचा मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल