धुमसणारी आग आणि धुराचे लोट पाहून विमान अपघात किती भीषण होता, हे लक्षात येतं. एअर इंडियाच्या विमान अहमदाबादहून लंडनच्या दिशेनं झेपावलं. मात्र टेकऑफ करताच अवघ्या काही मिनिटातच मेघारी नगर परिसरात विमान कोसळलं. विमान कोसळताच आगडोंब झाला आणि धुरानं सर्व परिसर व्यापला गेला. परिसरात विमानाचे अवशेष विखरले गेले. थरकाप उडवणारा अपघाताचा व्हिडीओ क्षणार्धात व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला.
advertisement
काय म्हणाले बिलावल भुट्टो?
एअर इंडियाच्या दुर्घटनेचा उल्लेख करत बिलवाल भु्ट्टो म्हणाले, ही घटनेची बातमी ऐकल्यानंतर अतिशय दु:ख झाले. मी भारतीय नागरिकांबद्दल मनापासून शोक व्यक्त करतो.
भारतातील हा सर्वात मोठा विमान अपघात
अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच विमान सुमारे 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या मेघानीनगर परिसरात कोसळलं. भारतातील हा सर्वात मोठा विमान अपघात असल्याचं बोललं जातंय. एअर इंडियाच्या फ्लाईट 171 या विमानानं दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी टेकऑफ केलं. त्यानंतर विमान 625 फुट उंचावर पोहोचलं. मात्र पुढच्याच मिनिटाला म्हणजे 1 वाजून 39 मिनिटांनी पायलटकडून एअर ट्राफीक कंट्रोल म्हणजेच एटीसीला मे डे कॉल देण्यात आला.
युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
मे डे कॉल म्हणजे आपत्कालीन परिस्थिती असते.विमान अनियंत्रित झाल्यास कॅप्टनकडून मे डे कॉल दिला जातो. मे डे कॉलनंतर एअर इंडियाचं विमान प्रतितास 475 फूट इतक्या वेगानं मेघानीनगर भागात कोसळलं. याठिकाणी हॉर्सकॅम्प, बीजे मेडिकल कॉलज आहे. विमान कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला अन् त्यानंतर आग लागली. आगीनंतर सर्वत्र धुराचे लोट उठत होते. माहिती मिळताच बचाव यंत्रणा घटनास्थळी पोहोचली आणि युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं.
