TRENDING:

अमेरिकेतून आली मोठी बातमी, ट्रम्प काही तरी खळबळजनक करण्याच्या तयारीत; जगाचं गणित बिघडणार

Last Updated:

Donald Trump: वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे खळबळ माजली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम जगाच्या सुरक्षिततेवर होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीआयए (सेंट्रल इंटेलिजेंस एजन्सी), एनएसए (नॅशनल सिक्युरिटी एजन्सी) आणि इतर गुप्तचर संस्थांमध्ये मोठ्या स्तरावर कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या एका वृत्तानुसार व्हाईट हाऊस आता अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेत मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. पेंटागननंतर आता गुप्तचर संस्थांची पाळी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील काही वर्षांत सीआयएमधील सुमारे 1,200 कर्मचाऱ्यांची छाटणी केली जाईल. एनएसए आणि इतर संस्थांमधूनही हजारो पदे समाप्त करण्याची योजना आहे.
News18
News18
advertisement

सीआयएच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यापूर्वीच स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांची कपात नवीन भरती थांबवून आणि नैसर्गिकरित्या रिक्त होणारी पदे न भरून केली जाईल. थेट कर्मचाऱ्यांची छाटणी करण्याची गरज भासणार नाही. परंतु यामुळे या संस्थांची ताकद आणि क्षमतेत मोठा बदल होईल.

तुलसी गॅबार्ड यांची साधी चुप्पी

सीआयएने एका निवेदनात म्हटले आहे की एजन्सीचे संचालक जॉन रॅटक्लिफ हे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या राष्ट्रीय सुरक्षा प्राधान्या लक्षात घेऊन हे पाऊल उचलत आहेत. निवेदनात म्हटले आहे, हे बदल सीआयएला नवी ऊर्जा देण्यासाठी, उदयोन्मुख नेतृत्वाला पुढे आणण्यासाठी आणि मिशन अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याच्या धोरणाचा भाग आहेत. तथापि या बदलांवर अमेरिकन काँग्रेसमध्ये खळबळ आहे. राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांच्या प्रवक्त्याने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गॅबार्ड यांचे कार्यालय 18 गुप्तचर संस्थांच्या समन्वयाचे काम करते. या संस्थांमध्ये सीआयए आणि एनएसए यांचाही समावेश आहे.

advertisement

अंतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार, सीआयए आणि एनएसएने यापूर्वीच काही कर्मचाऱ्यांना स्वेच्छेने राजीनामा देण्याचा पर्याय दिला आहे. विशेष म्हणजे, ज्या नवीन कर्मचाऱ्यांची अलीकडेच नियुक्ती झाली होती. त्यापैकी काहींनाही आता नारळ दिला जाणार आहे. हे बदल संस्थात्मक संरचनेत मोठे बदल घडवणारे आहेत. कारण आतापर्यंत गुप्तचर संस्थांना अमेरिकेच्या ‘डीप स्टेट’ (Deep State) चा भाग मानले जात होते. ज्या अनेकदा सत्ता बदलांपासून अलिप्त राहिल्या होत्या.

advertisement

ट्रम्प प्रशासनाने गुप्तचर यंत्रणेतील विविधता, समानता आणि समावेशकता (DEI) यांसारखे कार्यक्रमही बंद केले आहेत. या कार्यक्रमांमध्ये काम करणाऱ्या 19 कर्मचाऱ्यांच्या छाटणीवर सध्या न्यायालयाने स्थगिती दिली आहे. परंतु प्रशासनाचा दृष्टिकोन स्पष्ट आहे की ते जुनी व्यवस्था मोडून काढण्याच्या मूडमध्ये आहेत.

ट्रम्प यांना काय बदल अपेक्षित आहेत?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

अलीकडेच एनएसए आणि सायबर कमांडच्या प्रमुखांना अचानक पदावरून हटवण्यात आले. सायबर धोक्यांच्या वाढत्या काळात अमेरिकेच्या गुप्तचर नेतृत्वाला स्थिरतेची गरज असताना हे पाऊल महत्त्वाचे मानले जाते. पण ट्रम्प यांच्या योजनेत ‘स्थिरते’साठी सध्या कोणतीही जागा नाही. सीआयएचे संचालक रॅटक्लिफ यांनी यापूर्वीच संकेत दिले आहेत की ते एजन्सीचे लक्ष चीनवर केंद्रित करू इच्छितात. त्यांचे म्हणणे आहे की मानवी स्रोतांकडून गुप्त माहिती गोळा करण्याला (Human Intelligence) प्राधान्य दिले जाईल. म्हणजेच तांत्रिक देखरेखीऐवजी जमिनीवरील हेरगिरीवर जोर दिला जाईल.

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
अमेरिकेतून आली मोठी बातमी, ट्रम्प काही तरी खळबळजनक करण्याच्या तयारीत; जगाचं गणित बिघडणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल