बलुचिस्तानमधील स्वातंत्र्यसैनिकांनी डेरा बुगती येथे असलेल्या पाकिस्तानच्या प्रमुख नैसर्गिक वायू क्षेत्रांवर मोठा हल्ला चढवला. या भागात पाकिस्तानच्या 100 हून अधिक वायू विहिरी आहेत. ज्या पाकिस्तानच्या ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात.
विमान प्रवासाच्या वेळापत्रकात बदल; Airportवर पोहोचण्याआधी ही बातमी वाचा
या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही विशिष्ट संघटनेने घेतली नसली तरी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या विविध गटांनी यापूर्वीही अशाप्रकारच्या तेल आणि वायू क्षेत्रांवर हल्ले केले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की पाकिस्तान सरकार बलुचिस्तानच्या नैसर्गिक संपत्तीचा गैरवापर करत आहे आणि या भागातील लोकांना त्याचा कोणताही लाभ मिळत नाही.
advertisement
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी आधुनिक शस्त्रांचा वापर केला आणि वायू क्षेत्राच्या अनेक ठिकाणी जोरदार स्फोट घडवले. या हल्ल्यामुळे वायू प्रकल्पातील कामकाज काही काळासाठी ठप्प झाले असून आगीच्या मोठ्या ज्वाला आणि धुराचे लोट दूरवरून दिसत होते.
पाकिस्तानकडून भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ला; लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले
पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून परिसराची घेराबंदी केली आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी मोठे शोध अभियान सुरू करण्यात आले आहे. मात्र दुर्गम भौगोलिक परिस्थिती आणि स्थानिक लोकांचा मिळणारा कथित पाठिंबा यामुळे सुरक्षा दलांना कारवाईमध्ये अडचणी येत आहेत.
या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या ऊर्जा संकटात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आधीच आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या पाकिस्तानसाठी हा हल्ला मोठा धक्का मानला जात आहे. वायू पुरवठा खंडित झाल्यास देशातील वीज निर्मिती आणि औद्योगिक उत्पादनावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
बलुचिस्तानमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून स्वातंत्र्यसैनिकांचे आणि पाकिस्तानच्या सुरक्षा दलांचे संघर्ष सुरू आहेत. बलुचिस्तानमधील अनेक गट पाकिस्तानपासून वेगळे होऊन स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याची मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक वायू क्षेत्रांवरील हा हल्ला या संघर्षाचा एक भाग म्हणून पाहिला जात आहे.
