साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, थोरियम प्रकल्पाचे वैज्ञानिक जू होंग्जी यांनी सांगितले की, गोबी वाळवंटात असलेली अणुभट्टी इंधनासाठी थोरियम मॉल्टन सॉल्टचा वापर करते. ही अणुभट्टी 2 मेगावॅट थर्मल पॉवर निर्माण करण्यासाठी बनवण्यात आली आहे.
तुम्ही GPay, PhonePe करणार अन् खिसा सरकारचा भरणार? UPI व्यवहाराबाबत आली अपडेट
थोरियम हे पृथ्वीच्या पृष्ठभागात आढळणारे किरणोत्सर्गी (रेडिओधर्मी) तत्व आहे. ज्याचा इंधन म्हणून उपयोग होतो. तज्ज्ञांचे मत आहे की हे एक ऊर्जा क्रांती ठरू शकते. इनर मंगोलियातील फक्त एक थोरियम-समृद्ध खाण चीनच्या ऊर्जा गरजा हजारो वर्षांपर्यंत पूर्ण करू शकते आणि यामुळे खूप कमी किरणोत्सर्गी कचरा तयार होईल.
advertisement
1970 मध्ये सुरू झाला प्रकल्प
चीनचा थोरियम मोल्टन सॉल्ट अणुभट्टी प्रकल्प 1970 च्या दशकात सैद्धांतिक संशोधनाने सुरू झाला. 2009 मध्ये जू यांना पुढील पिढीच्या अणुऊर्जा तंत्रज्ञानाला प्रत्यक्षात आणण्याचे काम सोपवण्यात आले. 2018 मध्ये प्रायोगिक अणुभट्टीचे बांधकाम सुरू झाल्यानंतर याला गती मिळाली आणि ऑक्टोबर 2023 पर्यंत ती तयार झाली. जून 2024 पर्यंत ती पूर्ण क्षमतेने चालू झाली. चार महिन्यांनंतर अणुभट्टी चालू असताना थोरियम इंधन पुन्हा भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. ज्यामुळे ही जगातील एकमेव चालू थोरियम अणुभट्टी बनली आहे.
गुंतवणूकदारांनो, आता फक्त देवाचा धावा; Gold Silver Ratioने वाजवली धोक्याची घंटा
चीनमध्ये आणखी एक मोठी थोरियम मोल्टन सॉल्ट अणुभट्टी बांधली जात आहे. 2030 पर्यंत ती तयार होण्याची शक्यता आहे. या संशोधन अणुभट्टीला 10 मेगावॅट वीज उत्पादन करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. थोरियम अणुभट्टी तंत्रज्ञान भविष्यात ऊर्जा उत्पादनाचा एक महत्त्वाचा भाग बनू शकते. हे तंत्रज्ञान सुरक्षित आणि अधिक टिकाऊ आहे. यामुळे चीनला ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर बनण्यास मदत मिळू शकते.
अमेरिका या तंत्रज्ञानाचा पुन्हा विकास करण्याचा प्रयत्न करत आहे. पण चीन या बाबतीत पुढे निघाला आहे. ही बातमी भारतासाठीही महत्त्वाची आहे. भारतात थोरियमचा प्रचंड साठा आहे. भारतातील थोरियमचा अंदाज 4,57,000 ते 5,08,000 टन दरम्यान आहे. जो जगाच्या थोरियम साठ्याच्या एक तृतीयांश आहे. अशा परिस्थितीत भारतही या तंत्रज्ञानावर काम करू शकतो आणि ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनू शकतो.
