पशुधनामध्ये वेगाने प्रसार, हजारो पशुधन ठार
हा रोग प्रामुख्याने जनावरांच्या माध्यमातून पसरत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक जनावरांना ठार मारण्यात आले आहे. या रोगाच्या प्रसारामागे एखाद्या मोठ्या षड्यंत्राचा संशय व्यक्त केला जात आहे. हंगेरीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे की, हा विषाणू नैसर्गिक नाही आणि जैविक हल्ला म्हणून पसरवण्याची शक्यता आहे.
advertisement
हंगेरीच्या पंतप्रधानांचे धक्कादायक विधान
हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ओरबान यांचे चीफ ऑफ स्टाफ गर्गेली गुल्यास यांनी सांगितले, सध्या आम्ही हा विषाणू नैसर्गिक नसल्याची शक्यता नाकारू शकत नाही. आम्हाला कृत्रिमरित्या तयार केलेल्या विषाणूचा सामना करावा लागत आहे, अशी शक्यता आहे. हा संशय एका विदेशी प्रयोगशाळेतून मिळालेल्या माहितीवर आधारित आहे. तथापि, त्याची पूर्णपणे पुष्टी झालेली नाही.
रोग प्रसाराची माहिती
जागतिक पशु आरोग्य संस्थेच्या (World Organisation for Animal Health) माहितीनुसार, या रोगाचा पहिला प्रादुर्भाव हंगेरीच्या उत्तर-पश्चिम सीमेजवळील एका गोठ्यात मार्च महिन्यात दिसून आला. त्यानंतर देशभरातील सुमारे 1,000 गोठ्यांची तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये चार नमुन्यांमध्ये विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.
सीमा क्रॉसिंग बंद
डिसेंबर 2024 पर्यंत हंगेरीमध्ये 8.61 लाख गुरे ढोरे होते. जे युरोपियन युनियनच्या एकूण पशुधन साठ्याच्या 1.2% आहे. हा रोग पसरू नये, यासाठी हजारो जनावरांना ठार मारण्यात आले आहे. स्लोव्हाकियाच्या दक्षिणेकडील भागातही या रोगाने वेगाने प्रसार केला आहे. त्यामुळे ऑस्ट्रियाने हंगेरीसोबत 21 आणि स्लोव्हाकियासोबत दोन सीमा क्रॉसिंग बंद केल्या आहेत. सीमारेषेवर निर्जंतुकीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत.
धोका नाही, मात्र घातक
हंगेरीतील शेतकरी पॉल मिक्सनर यांनी सांगितले की, त्यांच्या 3,000 जनावरांना ठार मारण्यात आले. ज्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पॉल मिक्सनर पुढे म्हणाले, प्रत्येकजण रडत होता, हे सत्य असू शकत नाही असे बोलत होता. तरीही, मिक्सनर यांनी पुन्हा उभारणीचा संकल्प केला आहे आणि दोन आठवड्यात चारा साठवण्याची योजना आखत आहेत. 'फुट-अँड-माऊथ' रोग मानवासाठी धोकादायक नाही. परंतु गुरे, मेंढ्या आणि शेळ्यांमध्ये तो वेगाने पसरतो. यामुळे ताप येतो आणि तोंडात फोड येतात.
