रावळपिंडीतील फातिमा जिन्ना विद्यापीठ नावाला तर हे महिलांचं विद्यापीठ आहे पण इथं आयएसआय एजंटला हनीट्रॅपचं स्पेशल ट्रेनिंग दिलं जातं. हनी ट्रॅप हा असा प्रकार आहे ज्यात अतिमहत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीला आकर्षित करून किंवा भावनात्मक जाळं फेकून त्याच्याकडून संवेदनशील माहिती मिळवली जाते. आताच्या काळात डिजिटल प्लॅटफॉर्म्स, सोशल मीडियाच्या माध्यमातून हनीट्रॅप केलं जातं. त्यामुळे इंटरनेटचा वापर हनीट्रॅपसाठी कसा करावा याचं प्रशिक्षण दिलं जातं. लाहौर आणि हैदराबादमध्येही हनीट्रॅपचे आयएसआयचे गोपनिय ट्रेनिंग सेंटर आहेत.
advertisement
पाकमध्ये हनीट्रॅपची युनिव्हर्सिटी
- रावळपिंडीत फातिमा जिन्ना वुमन युनिव्हर्सिटी (FJMU)
- पाक लष्करी हेडक्वॉर्टरच्या जवळच FJMU
- ISI एजंटला हनीट्रॅपचं स्पेशल ट्रेनिंग
- संवेदनशील माहितीसाठी जाळ्यात अडकवण्याचं ट्रेनिंग
- कराची, हैदराबादमध्येही हनीट्रॅपचे ट्रेनिंग सेंटर
- डिजिटल प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया हनीट्रॅपचं नवं शस्त्र
- शासकीय, लष्करी अधिकारी, शास्त्रज्ञ, नेत्यांना जाळ्यात अडकवलं जातं
- ब्लॅकमेलिंग किंवा आमिष दाखवून माहिती मिळवतात
या विद्यापीठांमध्ये कोणाला प्रवेश मिळतो, फी, अटी, पात्रता काय या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 2023मध्ये DRDOचा शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकरला हनीट्रॅप करून पाकिस्तानी महिला एजंटनं संरक्षण विषयक संवेदनशील माहिती मिळवल्याचं उघड झालं होतं.
हनीट्रॅप कसं केलं जातं?
- बोगस प्रोफाईलच्या माध्यमातून मैत्री
- खासगी चर्चेतून भावनिक नातं
- व्हिडीओ कॉल्सवरून खासगी संवाद
- पैशाचं आमिष किंवा ब्लॅकमेलिंग
- संवेदनशील माहितीसाठी दबाव
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे यानंतर आतापर्यंत हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली 11 जणांना अटक करण्यात आली आहे. हरिणाया, पंजाब, उत्तरप्रदेश, ओडिशामधून संशयितांना अटक करण्यात आली. या तरुण इन्फ्लुएंसर्स, विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हेरगिरी केल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आली आहे.
