TRENDING:

Iran : इराणच्या हल्ल्यानंतर थायलंडचे जहाज भरकटले, ३ खलाशी बेपत्ता! होर्मुझमध्ये नेमकं घडलं काय?

Last Updated:

Iran War: होर्मुझ सामुद्रधुनीतून तेल आणि गॅसची जलवाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. तर, दुसरीकडे होर्मुझमधील काही जहाजांवर इराणने केलेल्या हल्ल्याने वातावरण तंग झाले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Iran Hormuz: अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात युद्ध पुकारल्याचे परिणाम आखातासह जगावर दिसू लागले आहेत. अमेरिका-इस्रायलने युद्ध लादल्यानंतर इराणने कोंडी करण्यासाठी होर्मुझ सामुद्रधुनीतील जलवाहतूक बंद केली. त्याच्या परिणामी जगाला इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून तेल आणि गॅसची जलवाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. तर, दुसरीकडे होर्मुझमधील काही जहाजांवर इराणने केलेल्या हल्ल्याने वातावरण तंग झाले आहे.
इराणच्या हल्ल्यानंतर थायलंडचे जहाज भरकटले, ३ खलाशी बेपत्ता! होर्मुझमध्ये नेमकं घडलं काय?
इराणच्या हल्ल्यानंतर थायलंडचे जहाज भरकटले, ३ खलाशी बेपत्ता! होर्मुझमध्ये नेमकं घडलं काय?
advertisement

जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या होर्मुजच्या सामुद्रधुनीतील (Strait of Hormuz) परिस्थिती दिवसेंदिवस स्फोटक होत चालली आहे. इराणच्या हल्ल्याचा बळी ठरलेले थायलंडचे कार्गो जहाज 'मयुरी नरी' (Mayuree Naree) आता केश्म बेटाजवळ समुद्रात अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे सागरी व्यापार मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

advertisement

मिळालेल्या वृत्तानुसार, ११ मार्च रोजी या जहाजावर भीषण हल्ला झाला होता. हल्ल्यानंतर जीव वाचवण्यासाठी जहाजावरील कर्मचाऱ्यांनी (क्रू) तातडीने जहाज सोडून सुरक्षित स्थळी धाव घेतली होती. मात्र, तेव्हापासून या जहाजावरील तीन नाविक बेपत्ता असून त्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. इराणमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हे रिकामे जहाज वाहत जात रामचाह गावाजवळील किनारपट्टीवर अडकले आहे.

advertisement

दरम्यान, होर्मुजची सामुद्रधुनी हा जगातील खनिज तेल आणि वायू वाहतुकीचा मुख्य मार्ग आहे. या भागात वाढत्या हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपन्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जर हे हल्ले थांबले नाहीत, तर जागतिक पुरवठा साखळी (Global Supply Chain) विस्कळीत होऊन इंधनाचे दर आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या इराण आणि संबंधित देशांमधील लष्करी हालचालींकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

advertisement

इतर संबंधित बातमी:

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
चवीला एकदम टेस्टी, उन्हाळ्यात बनवा पारंपरिक कैरीचा ठेचा, संपूर्ण रेसिपीचा Video
सर्व पहा

Iran Israel Conflict: इराणसोबतच्या जमिनीवरील युद्धापूर्वी इस्रायलची मोठी कबुली, नेतन्याहू सरकारचं टेन्शन वाढलं, लष्करप्रमुखांनी काय सांगितलं?

मराठी बातम्या/विदेश/
Iran : इराणच्या हल्ल्यानंतर थायलंडचे जहाज भरकटले, ३ खलाशी बेपत्ता! होर्मुझमध्ये नेमकं घडलं काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल