TRENDING:

भारताच्या मोठ्या विजयानंतर पाकिस्तान गुडघ्यावर...; शस्त्रसंधीचा प्रस्ताव का मान्य केला? पहिली प्रतिक्रिया

Last Updated:

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान संघर्षात तातडीने शस्त्रसंधी करण्यास मान्यता दिली आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
इस्लामाबाद: संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या भारत-पाकिस्तान संघर्षात शनिवारी अचानक मोठी घडामोड घडली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशात तातडीने शस्त्रसंधी करण्यास मान्यता दिल्याचे जाहीर केले. अमेरिकेने केलेल्या मध्यस्थीनंतर रात्री उशिरापर्यंत चाललेल्या चर्चेअंती हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
News18
News18
advertisement

गेल्या काही दिवसांपासून भारत-पाकिस्तान यांच्यात युद्ध परिस्थिती सुरू आहे. दोन्ही देशांकडून जोरदार लष्करी कारवाई सुरू होती. या कारवाईत भारताने आतापर्यंत प्रत्येक वेळी बाजी मारली होती. पाकिस्तानवर गुढघ्यावर बसण्याची वेळ आली होती. अशात अमेरिकेकडून झालेल्या या शस्त्रसंधीला त्यांनी तातडीने मान्यता दिली. पाकिस्तान विरूद्धच्या या लढाईत भारताचा मोठा विजय झाल्यावर ही शस्त्रसंधी झाली आहे.

advertisement

भारत-पाकिस्तानमध्ये तातडीने शस्त्रसंधी, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

दरम्यान ट्रम्प यांच्या या घोषणानंतर पाकिस्तानकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री इशाक दार यांनी एक्स वर म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तान तात्काळ प्रभावाने शस्त्रसंधी करण्यास सहमत झाले आहेत. पाकिस्तानने आपल्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेशी तडजोड न करता, या प्रदेशात शांतता व सुरक्षेसाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत!

advertisement

अमेरिकेचे सचिव मार्को रुबियो यांची घोषणा

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण वातावरणात मोठी घडामोड घडली आहे. अमेरिकेचे सचिव मार्को रुबियो यांनी ट्विट करत जाहीर केलं आहे की गेल्या 48 तासांत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, दोन्ही देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, परराष्ट्र मंत्री आणि लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा करून, भारत व पाकिस्तानने तात्काळ शस्त्रसंधी आणि सर्वसमावेशक चर्चेची सुरुवात करण्यावर सहमती दर्शवली आहे.

advertisement

रुबियो यांनी पंतप्रधान मोदी आणि शरीफ यांच्या नेतृत्वाचं आणि शांततेचा मार्ग स्वीकारल्याबद्दल कौतुक केलं आहे. आता ही शांततेची प्रक्रिया कितपत यशस्वी ठरेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मराठी बातम्या/विदेश/
भारताच्या मोठ्या विजयानंतर पाकिस्तान गुडघ्यावर...; शस्त्रसंधीचा प्रस्ताव का मान्य केला? पहिली प्रतिक्रिया
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल