TRENDING:

Breaking News: भारत-पाकिस्तानमध्ये तातडीने शस्त्रसंधी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

Last Updated:

India Pakistan Tension: डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले की अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तानने तात्काळ शस्त्रसंधीला सहमती दर्शवली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वॉशिंग्टन: गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या तणावाच्या पाश्वभूमीवर अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या @realDonaldTrump या एक्स हँडलवरून एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, भारत आणि पाकिस्तानने संपूर्ण आणि तात्काळ शस्त्रसंधीस सहमती दर्शवली आहे. अमेरिकेने केलेल्या मध्यस्थीनंतर रात्री उशिरापर्यंत चाललेल्या चर्चेअंती हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
News18
News18
advertisement

ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे:

अमेरिकेने मध्यस्थी केलेल्या रात्रीच्या प्रदीर्घ चर्चेनंतर मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानने संपूर्ण आणि तात्काळ शस्त्रसंधीस (FULL AND IMMEDIATE CEASEFIRE) सहमती दर्शविली आहे. दोन्ही देशांनी Common Sense आणि महान Great Intelligence वापर केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद!"

advertisement

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे दोन्ही देशांमधील संबंधांवर आणि दक्षिण आशियातील राजकारणावर याचे काय परिणाम होतील याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मराठी बातम्या/विदेश/
Breaking News: भारत-पाकिस्तानमध्ये तातडीने शस्त्रसंधी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल