TRENDING:

फक्त 6 मिनिटात टर्कीचा नकाशा बदलेल, भारताचे 'ब्रह्मोस' पेक्षा भयानक Missile; पंगा महागात पडेल

Last Updated:

भारत आणि पाकिस्तानमधील तणावानंतर तुर्कस्तान आणि अझरबैजानविरोधात भारताने कारवाई सुरू केली आहे. भारताच्या लष्करी ताकदीमुळे तुर्कस्तानला मोठे नुकसान होऊ शकते, असे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अंकारा/नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी तणाव संपला असला तरी दोन्ही देशातील संबंध अजून तणावाचे आहेत. पाकिस्तान सोबतच्या तणावावेळी भारताविरोधी भूमिका घेणाऱ्या देशांसोबत आता संघर्ष सुरू झाला आहे. दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कस्तान आणि अझरबैजान या दोन्ही देशांविरोधात भारताने कारवाई सुरू केली आहे.
News18
News18
advertisement

केवळ धर्माच्या आधारावर या दोन्ही देशांनी विचार न करता पाकिस्तानला पाठिंबा दिला. आता देश भरात या दोन्ही देशांबद्दल नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे. या देशातील पर्यटनावर बहिष्कार टाकण्यात आला आहे तर येथून येणाऱ्या वस्तू देखील खरेदी न करण्याची भूमिका घेतली आहे. पहलगाममध्ये ज्या प्रकारचा दहशतवादी हल्ला झाला त्यासाठी तुर्कस्तानने पाकिस्तानची बाजू घेण्याचे काहीच कारण नव्हते तरी देखील त्यांनी घेतलेल्या या भूमिकेचा आता फटका बसण्यास सुरूवात झाली आहे.

advertisement

तुर्कस्तानचे भारताशी युद्ध झाले. तर ते दोन दिवसही टिकू शकणार नाही. भारताकडे अशी अनेक विनाशकारी क्षेपणास्त्रे आहेत, जी तुर्कस्तानला काही क्षणांत उद्ध्वस्त करू शकतात. जर दोन्ही देशांच्या सैन्यदलांची तुलना केली तर तुर्कस्तान भारताच्या तुलनेत खूप मागे आहे. भारताची वायुसेनाही अत्यंत प्रभावी आणि मोठी आहे. भारताकडे एकूण 2229 विमाने आहेत. तर टर्कीकडे केवळ 1083 विमाने आहेत. लढाऊ विमानांच्या बाबतीतही भारत आघाडीवर आहे. भारताच्या ताफ्यात 513 लढाऊ विमाने आहेत. तर टर्कीकडे केवळ 201 विमाने आहेत. याशिवाय भारताकडे ब्रह्मोस आणि अग्नीसारखी अत्यंत घातक क्षेपणास्त्रे आहेत जी शत्रूंना धूळ चारण्यासाठी सक्षम आहेत.

advertisement

भारताने ‘अग्नी’चा वापर केल्यास...

भारत आणि टर्की यांच्यातील हवाई अंतर सुमारे 4565 किलोमीटर आहे. जर भारताला आपल्या भूमीवरून हल्ला करायचा असेल, तर ‘अग्नी-5’ हे क्षेपणास्त्र सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. ‘अग्नी-5’ ची मारक क्षमता 5000 ते 8000 किलोमीटरपर्यंत आहे. हे क्षेपणास्त्र सुमारे 29400 किलोमीटर प्रतितास वेगाने प्रवास करते. त्यामुळे जर भारताने याचा वापर केला. तर टर्की काही मिनिटांत उद्ध्वस्त होऊ शकते. ‘अग्नी-5’ हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) विकसित केले आहे आणि ते भारताचे सर्वात लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. विशेष म्हणजे हे क्षेपणास्त्र 1000 किलोग्रामपर्यंत अणुबॉम्ब वाहून नेण्याची क्षमता ठेवते.

advertisement

ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र

ब्रह्मोस क्षेपणास्त्राची मारक क्षमता 450 ते 600 किलोमीटरपर्यंत आहे. हे क्षेपणास्त्र जमीन, समुद्र आणि हवा या तिन्ही ठिकाणांहून डागता येते. या क्षेपणास्त्राची तैनाती सुखोई-30 लढाऊ विमाने आणि नौदलाच्या जहाजांवर करण्यात आली आहे. हे क्षेपणास्त्र भारत आणि रशियाने एकत्रितपणे विकसित केले आहे. जर भारताला टर्की विरुद्ध या क्षेपणास्त्राचा वापर करायचा असेल तर त्याला लक्ष्यभेदासाठीची हवाई अंतर कमी करण्यासाठी इतर कोणत्याही देशाची मदत घ्यावी लागेल. कारण ब्रह्मोसची मारक क्षमता केवळ 600 किलोमीटरपर्यंतच आहे.

advertisement

एकंदरीत भारत आणि तुर्किये यांच्यातील लष्करी ताकदीची तुलना करता भारताचे पारडे जड आहे. भारताच्या शक्तिशाली क्षेपणास्त्रांमुळे टर्कीला कोणत्याही परिस्थितीत मोठे नुकसान सोसावे लागू शकते, असे मत संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

मराठी बातम्या/विदेश/
फक्त 6 मिनिटात टर्कीचा नकाशा बदलेल, भारताचे 'ब्रह्मोस' पेक्षा भयानक Missile; पंगा महागात पडेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल