प्लांट सुरक्षित, कर्मचारी सुखरूप
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, हे क्षेपणास्त्र अणूप्रकल्पाच्या आवारातच कोसळले. सुदैवाने, मुख्य रिअॅक्टर किंवा प्लांटच्या संरचनेला कोणतीही हानी पोहोचलेली नाही. इराणच्या अणू ऊर्जा संस्थेने स्पष्ट केले आहे की, सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत आणि परिसरात किरणोत्सर्गाचा (Radiation) स्तर पूर्णपणे सामान्य आहे. रशियाच्या 'रोसाटोम' या संस्थेनेही या घटनेचा निषेध करत प्लांट सुरक्षित असल्याचे जाहीर केले आहे.
advertisement
IAEA कडून गंभीर दखल
इराणने तातडीने या हल्ल्याची माहिती आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेला (IAEA) दिली. संस्थेचे प्रमुख राफेल ग्रॉसी यांनी सर्व देशांना आवाहन केले आहे की, अशा संवेदनशील ठिकाणांजवळ कोणत्याही प्रकारची लष्करी कारवाई टाळावी. अणूप्रकल्पाला धक्का लागल्यास मोठा अणुअपघात होऊन मानवी जीवनाला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.
बुशहर प्लांटचे महत्त्व
पर्शियन आखाताच्या किनाऱ्यावर असलेला बुशहर प्लांट हा इराणचा एकमेव सक्रिय अणुऊर्जा प्रकल्प आहे. गेल्या वर्षी अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन गुप्त अणूतळांवर 'B-2 स्टील्थ बॉम्बर'ने भीषण हल्ला केला होता, ज्यात अनेक शास्त्रज्ञ मारले गेले होते. त्यानंतर आता थेट सक्रिय प्लांटला लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाल्याने आखाती देशांमध्ये युद्धाची भीषणता वाढली आहे.
