TRENDING:

America attack on Iran : 'सुरुवात तुम्ही केली आम्ही शेवट करणार', इराणची अमेरिकेला धमकी, 'आता आम्ही...'

Last Updated:

Iran Reaction On US Attack : इराणच्या इशाऱ्यानंतर आता अमेरिकाही अलर्ट मोडवर आली आहे. आखाती देशातील लष्करी तळांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली: इस्रायल-इराण युद्धात अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक तळा हल्ले केले. आण्विक तळ उद्धवस्त केल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आता इराणही चांगलाच खवळला आहे. सुरुवात तुम्ही केलीय आणि आता शेवट आम्ही करणार असल्याचे इराणने अमेरिकेला ठणकावले आहे. इराणच्या इशाऱ्यानंतर आता अमेरिकाही अलर्ट मोडवर आली आहे. आखाती देशातील लष्करी तळांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे.
News18
News18
advertisement

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने चांगलाच संताप व्यक्त केला आहे. अमेरिकेने फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान येथील इराणच्या आण्विक तळावर हवाई हल्ला केला आहे. पर्वतांमध्ये खोलवर असलेले इराणचे फोर्डो अणुस्थळ आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला. फोर्डो अणुस्थळ जमिनीखाली आहे. मात्र तरीही हे अणुस्थळ नष्ट करण्यात अमेरिकेला यश आलं असल्याचं म्हटलं जात आहे. गहोमजवळील डोंगराळ प्रदेशात असलेले फोर्डो अणुस्थळ नेहमीच अमेरिका, इस्रायल आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांच्या रडारवर राहिलं आहे.

advertisement

हे ही वाचा: अमेरिकेचा इराणच्या 3 आण्विक केंद्रांवर हल्ला, अंडरग्राऊंड फोर्डो अणुस्थळही बेचिराख, मध्यरात्री एअर स्ट्राईक करत उडवल्या चिंधड्या

इराणची अमेरिकेला धमकी...

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणनेही उघड धमकी दिली आहे. इराणच्या सरकारी टेलिव्हिजनवर प्रसारित झालेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'आता या प्रदेशात उपस्थित असलेला प्रत्येक अमेरिकन नागरी आणि लष्करी कर्मचारी आमच्यासाठी लक्ष्य आहे. ट्रम्प यांना थेट उद्देशून इराणने म्हटले की सुरुवात तुम्ही केली आणि शेवट आम्ही करणार आहोत. इराणच्या या तीव्र प्रतिक्रियेमुळे इराणी सैन्य अमेरिकेवर लवकरच पलटवार करणार असल्याचे म्हटले जात आहे.

advertisement

आण्विक तळ आधीच रिकामे केले होते?

इराणची सरकारी वृत्तसंस्था आयआरआयबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमेरिकेने लक्ष्य केलेल्या तीन आण्विक तळ आधीच रिकामे केले होते. मात्र, या दाव्याची इतर स्वतंत्रपणे पु्ष्टी होऊ शकली नाही. अमेरिकेने आपली कारवाई पूर्ण केल्यानंतर आणि इराणने या हल्ल्याची पुष्टी केल्यानंतर आण्विक तळ रिकामा केल्याचा दावा केला जात आहे.

advertisement

फोर्डो अणुस्थळ इराणच्या अणुकार्यक्रमाचा सर्वात संवेदनशील आणि संरक्षित भाग मानला जातो. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला ते जुन्या लष्करी तळावर बांधण्यास सुरुवात झाली. त्याची खासियत अशी आहे की त्याचा मोठा भाग 60 ते 90 मीटर खोल पर्वतांमध्ये लपलेला आहे. हे ठिकाण IAEA (आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था) च्या नजरेपासून वाचवण्यासाठी भूमिगत बोगद्यांमध्ये बांधण्यात आले होते. 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय गुप्तचर संस्थांनी या जागेची माहिती सार्वजनिक केली. 2012 मध्ये येथे 20 टक्क्यांपर्यंत युरेनियम समृद्धीकरण सुरू करण्यात आले. जे वैद्यकीय वापरासाठी असल्याचे म्हटले जात होते. आतापर्यंत येथे सुमारे 3000 सेंट्रीफ्यूज बसवण्यात आले आहेत, ज्यामुळे त्याचे लष्करी महत्त्व अनेक पटीने वाढते.

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
America attack on Iran : 'सुरुवात तुम्ही केली आम्ही शेवट करणार', इराणची अमेरिकेला धमकी, 'आता आम्ही...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल