अमेरिकेचा इराणच्या 3 आण्विक केंद्रांवर हल्ला, अंडरग्राऊंड फोर्डो अणुस्थळही बेचिराख, मध्यरात्री एअर स्ट्राईक करत उडवल्या चिंधड्या

Last Updated:

America Attack on Iran : इस्त्रायल आणि इराणच्या संघर्षात आता अमेरिकेनं उडी घेतली आहे. अमेरिकेने शनिवारी मध्यरात्री उशिरा इराणच्या तीन आण्विक स्थळांवर हल्ला केला आहे.

News18
News18
America Attack on Iran : इस्त्रायल आणि इराणच्या संघर्षात आता अमेरिकेनं उडी घेतली आहे. अमेरिकेने शनिवारी मध्यरात्री उशिरा इराणवर हल्ला केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर याबाबतची घोषणा केली. अमेरिकेने फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान येथील इराणच्या अणुस्थळांवर अतिशय यशस्वी हवाई हल्ला केला आहे. पर्वतांमध्ये खोलवर असलेले इराणचे फोर्डो अणुस्थळ आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला.
सोशल मीडियावरील पोस्टमध्ये ट्रम्प यांनी लिहिले की, 'आम्ही फोर्डो, नतान्झ आणि एस्फहानसह इराणमधील तीन अणुस्थळांवर यशस्वी हल्ला केला. आमची सर्व विमानं आता इराणच्या हवाई हद्दीतून बाहेर पडली आहेत. पहिलं टार्गेट असलेल्या फोर्डोवर बॉम्बचा संपूर्ण पेलोड टाकण्यात आला. सर्व विमाने सुरक्षितपणे घरी परतत आहेत. आमच्या महान अमेरिकन योद्ध्यांचं अभिनंदन. जगात असं दुसरे कोणतंही सैन्य नाही, जे हे करू शकले असते. आता शांततेची वेळ आली आहे.'
advertisement
डोनाल्ड ट्रम्प भारतीय वेळेनुसार सकाळी ७:३० वाजता भाषण करतील. यात ट्रम्प हल्ल्याबाबतचा अधिकचा तपशील देण्याची शक्यता आहे. न्यू यॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, इराणी अधिकाऱ्यांनी कबूल केले की हा हल्ला स्थानिक वेळेनुसार पहाटे २:३० वाजता झाला. फोर्डो अणुस्थळ जमिनीखाली आहे. मात्र तरीही हे अणुस्थळ नष्ट करण्यात अमेरिकेला यश आलं असल्याचं म्हटलं जात आहे.
advertisement
ट्रम्प यांनी फोर्डोबद्दल लिहिले की, फोर्डो नष्ट झाला आहे. इराणी शहर गहोमजवळील डोंगराळ प्रदेशात असलेले फोर्डो अणुस्थळ नेहमीच अमेरिका, इस्रायल आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांच्या रडारवर राहिलं आहे. २००९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा या अणुस्थळाची माहिती उघड झाली, तेव्हा जगाला कळले की इराणने ते ६० ते ९० मीटर खोल जमीनीत हे अणुस्थळ लपवलं होतं. असं मानलं जातं आहे की येथे ३,००० पर्यंत युरेनियम समृद्धीकरण सेंट्रीफ्यूज बसवले गेले आहेत.
advertisement

बी-२ स्टेल्थ बॉम्बर्सने हल्ला

सध्या ट्रम्प यांनी हल्ला कसा केला? याची स्पष्ट माहिती दिली नाही. परंतु अमेरिकन संरक्षण खात्यातील सूत्रांनुसार, या मोहिमेत अत्याधुनिक बी-२ स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर्सचा वापर करण्यात आला. ही तीच विमाने आहेत जी ३०,००० पौंड वजनाचे GBU-५७ बॉम्ब वाहून नेऊ शकतात. जे विशेषतः जमीनीत खोलवर लपून ठेवलेल्या टार्गेटला नष्ट करण्यासाठी उपयोगी ठरतात. फोर्डो अणुस्थळ नष्ट करण्यासाठी हा बॉम्ब वापरला गेला असावा, असा दावा आता केला जात आहे. कारण फक्त हाच बॉम्ब इतक्या खोलवर हल्ला करू शकतो.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
अमेरिकेचा इराणच्या 3 आण्विक केंद्रांवर हल्ला, अंडरग्राऊंड फोर्डो अणुस्थळही बेचिराख, मध्यरात्री एअर स्ट्राईक करत उडवल्या चिंधड्या
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement