TRENDING:

Iran War US: इराणच्या युद्धात ट्रम्प यांना आणखी एक झटका, अमेरिकेचे सर्वात शक्तिशाली विमान जमीनदोस्त! आखातामध्ये घडलं काय?

Last Updated:

US Plane Crash At Iraq: या अपघातामुळे अमेरिकेच्या इराणविरुद्धच्या मोहीमेला धक्का बसला आहे. अमेरिकन हवाई दलाचे हे विमान अपघाताने पडले की इराणने पाडले याबाबत चर्चांना उधाण आले आहे. विमानात ५ क्रू सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बगदाद : इराणच्या कडव्या प्रतिकारामुळे आधीच हैराण झालेल्या अमेरिकेला मोठा झटका बसला आहे. अमेरिकन हवाई दलाचं KC-135 टँकर विमान इराकमध्ये कोसळलं आहे. या अपघातामुळे अमेरिकेच्या इराणविरुद्धच्या मोहीमेला धक्का बसला आहे. अमेरिकन हवाई दलाचे हे विमान अपघाताने पडले की इराणने पाडले याबाबत चर्चांना उधाण आले आहे. विमानात ५ क्रू सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे.
इराणच्या युद्धात ट्रम्प यांना आणखी एक झटका, अमेरिकेचे सर्वात शक्तिशाली विमान जमीनदोस्त!
इराणच्या युद्धात ट्रम्प यांना आणखी एक झटका, अमेरिकेचे सर्वात शक्तिशाली विमान जमीनदोस्त!
advertisement

पश्चिम इराकमध्ये अमेरिकन हवाई दलाला मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेचे अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे KC-135 स्ट्रॅटोटँकर विमान एका लष्करी मोहिमेदरम्यान दुर्घटनाग्रस्त झाले. ही घटना 'ऑपरेशन एपिक फ्युरी' (Operation Epic Fury) अंतर्गत सुरू असलेल्या मोहीमेदरम्यान घडली. या विमानात किमान ३ क्रू मेंबर्स असण्याची शक्यता असून, सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

advertisement

नेमकं काय घडलं?

युएस सेंट्रल कमांडने (US Central Command) दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेत दोन विमाने सामील होती. त्यापैकी एक विमान सुखरूप लँडिंग करण्यात यशस्वी झाले. मात्र दुसरे विमान पश्चिम इराकच्या भागात कोसळले. अमेरिकन लष्कराने याला 'मोठे नुकसान' म्हटले आहे. विशेष म्हणजे, ज्या 'ऑपरेशन एपिक फ्युरी' अंतर्गत हे विमान उड्डाण करत होते, ते ऑपरेशन प्रामुख्याने इराणवरील हल्ल्यांशी संबंधित असल्याचे मानले जाते.

advertisement

advertisement

इराणचा हल्ला की तांत्रिक बिघाड?

विमान कोसळल्यानंतर सोशल मीडियावर तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र, अमेरिकन लष्कराने 'X' (ट्विटर) वर स्पष्ट केले आहे की, ही दुर्घटना शत्रूच्या गोळीबारात किंवा कोणत्याही हल्ल्यात झालेली नाही. तसेच, हा मानवी चुकीचा परिणाम नसल्याचा दावाही सैन्याने केला आहे. विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास आता सुरू आहे.

advertisement

KC-135 टँकर का आहे खास?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात मोठी उलथापालथ, कांदा आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

हे विमान अमेरिकन हवाई दलाचा कणा मानले जाते. हे विमान हवेत उडतानाच इतर फायटर जेट्स आणि बॉम्बर विमानांमध्ये इंधन भरण्याचे काम करते. ताशी ९०० किमी वेगाने उडणारे हे विमान हजारो किलो इंधन वाहून नेऊ शकते. यामुळे लढाऊ विमानांना जमिनीवर न उतरता लांब अंतरापर्यंत हल्ले करणे शक्य होते.

मराठी बातम्या/विदेश/
Iran War US: इराणच्या युद्धात ट्रम्प यांना आणखी एक झटका, अमेरिकेचे सर्वात शक्तिशाली विमान जमीनदोस्त! आखातामध्ये घडलं काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल