TRENDING:

Kazakhstan Plane Crash: हेलकावे खात कोसळलं विमान, एका क्षणात होत्याचं नव्हतं, अपघाताचा थरारक VIDEO

Last Updated:

Kazakhstan Plane Crash: अझरबैझानहून रशियाकडे जाणाऱ्या विमानाचा अपघात झाला आहे. हे विमान कझाकिस्तानमध्ये कोसळले असून मोठी जीवितहानी झाली असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली :  अझरबैझानहून रशियाकडे जाणाऱ्या विमानाचा अपघात झाला आहे. हे विमान  कझाकिस्तानमध्ये कोसळले असून मोठी जीवितहानी झाली असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, या विमानात क्रूसह 110 प्रवासी प्रवास करत होते.

Kazakhstan Plane Crash: कसा झाला विमान अपघात, पहिला VIDEO आला समोर
Kazakhstan Plane Crash: कसा झाला विमान अपघात, पहिला VIDEO आला समोर
advertisement

अपघातग्रस्त विमान हे अझरबैझान एअरलाईन्सचे असल्याची माहिती आहे. अझरबैझानमधील बाकूमधून या विमानाने रशियासाठी उड्डाण घेतले. मात्र, कझाकिस्तानमध्ये असताना या विमानाचा भीषण अपघात झाला. जमिनीवर लँड झाल्यानंतर विमानाला आग लागली आणि स्फोट झाला. विमान धावपट्टीवर लँडींग करत असताना, समतोल बिघडून हा अपघात झाल्याचं व्हिडीओत दिसत आहे. हा अपघात नेमका कसा झाला, याची अधिकची माहिती अद्याप उपलब्ध झाली नाही.

advertisement

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

या अपघाताची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.  या अपघातात सहा जण बचावले आहेत, याबाबतची माहिती कझाकस्तानच्या आपत्कालीन मंत्रालयाने दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
Kazakhstan Plane Crash: हेलकावे खात कोसळलं विमान, एका क्षणात होत्याचं नव्हतं, अपघाताचा थरारक VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल