युद्धाच्या खर्चाची कल्पना येण्यासाठी दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था आणि संरक्षण बजेटची तुलना करणे महत्त्वाचे ठरते. पाकिस्तानची एकूण अर्थव्यवस्था सध्या सुमारे 32 लाख कोटी रुपयांची आहे. त्यांचा वार्षिक संरक्षण बजेट 66 हजार 315 कोटी रुपये आहे. याउलट भारताची अर्थव्यवस्था पाकिस्तानच्या तुलनेत खूप मोठी आहे. भारताची अर्थव्यवस्था तब्बल 336 लाख कोटी रुपये आहे. तर भारताचा संरक्षण बजेट 6 लाख 81 हजार कोटी रुपये (6,81,000 कोटी रुपये) इतका प्रचंड आहे.जो पाकिस्तानच्या संरक्षण बजेटच्या जवळपास 10 पट अधिक आहे.
advertisement
पैशांसाठी पाकिस्तानने दारूगोळा विकला, 96 तासांत करावे लागले सरेंडर
या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की प्रत्येक दिवसाला 2,100 कोटी रुपये खर्च होणारे युद्ध पाकिस्तानसारखा आर्थिक संकटात असलेला देश किती दिवस सुरू ठेवू शकेल? पाकच्या एकूण अर्थव्यवस्थेचा आकार आणि संरक्षण बजेट पाहता, इतका मोठा दैनिक खर्च पेलणे त्यांच्यासाठी अत्यंत कठीण आहे. कदाचित काही दिवसांपेक्षा जास्त नाही.
केवळ संभाव्य युद्धाचा खर्चच नाही. तर सध्याच्या तणावामुळे आणि युद्धाच्या धोक्यामुळे पाकिस्तानला आपल्या सैनिकांना हाय अलर्टवर ठेवण्यासाठी दररोज 27 कोटी रुपये खर्च करावे लागत आहेत. पाकिस्तानच्या सध्याच्या नाजूक आर्थिक परिस्थिती पाहता, हा दैनंदिन खर्च देखील त्यांना मोठा आर्थिक भार ठरत आहे. यामुळे पाकिस्तानसाठी कोणत्याही प्रकारची लष्करी वाढ किंवा दीर्घकाळ चालणारा संघर्ष आर्थिकदृष्ट्या विनाशकारी ठरू शकतो हे स्पष्ट होते.
