पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, ते (भारत आणि पाकिस्तानचे सैन्य) एकमेकांवर जोरदार हल्ला करत होते आणि ते थांबणार नाही असे दिसत होते. या युद्धबंदीचे श्रेय घेत ते पुढे म्हणाले, आम्ही अणुसंघर्ष थांबवला. मला वाटते की ते एक मोठे आणि वाईट अणुयुद्ध ठरू शकले असते. ज्यात लाखो लोक मारले गेले असते. त्यामुळे मला याचा खूप अभिमान आहे.
advertisement
युद्धा सुरू राहिल्यास व्यापार थांबवण्याची धमकी दिल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले, मात्र त्यांची ही टिप्पणी कोणाला उद्देशून होती, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
दरम्यान, ऑपरेशन सिंदूर'नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सशस्त्र दलांना स्पष्ट निर्देश दिले होते की गोळीबाराला तोफखान्याने उत्तर दिले जाईल (वहाँ से गोली चलेगी, तो यहाँ से गोला चलेगा), असे सरकारी सूत्रांनी सांगितले.
भारताने काश्मीरच्या मुद्द्यावर कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीची शक्यता स्पष्टपणे नाकारली आहे. भारताने म्हटले आहे की पाकिस्तानने त्यांच्या अवैध ताब्यात असलेले क्षेत्र परत करणे हा एकमेव प्रलंबित मुद्दा आहे.
शनिवारी सायंकाळी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी घोषणा केली की भारत आणि पाकिस्तान भूभाग, हवाई आणि समुद्रावरील सर्व प्रकारच्या गोळीबार आणि लष्करी कारवाई त्वरित थांबवण्यास सहमत झाले आहेत. ही घोषणा चार दिवसांच्या तीव्र सीमापार ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर आली.
या युद्धबंदीचा उल्लेख सर्वप्रथम ट्रम्प यांनी सार्वजनिकरित्या केला होता आणि वॉशिंग्टनने या करारात मध्यस्थी केल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी एक निवेदन जारी करून भारत आणि पाकिस्तानच्या सरकारांनी पूर्ण युद्धबंदी स्वीकारली असून तटस्थ ठिकाणी विस्तृत चर्चा सुरू करतील, असे स्पष्ट केले.
