राणा हा पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) आणि लष्कर-ए-तोयबाच्या (LeT) संपर्कात असल्याचा ठपका आहे. 2009 मध्ये अमेरिकेत अटक झालेला राणा याच्यावर डॅनिश वृत्तपत्र ‘ज्युलँड्स-पोस्टन’वर हल्ल्याचा कट आणि दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणे यासारख्या गंभीर आरोपांखाली दोषी ठरवण्यात आले होते.
ट्रम्प यांची प्रत्यर्पणाला मान्यता
फेब्रुवारी 2025 मध्ये तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राणाच्या प्रत्यर्पणास अधिकृत मंजुरी दिली होती. ट्रम्प म्हणाले होते, तहव्वुर राणा भारतात पाठवला जाणार असून तिथे त्याला योग्य शिक्षा भोगावी लागेल. तो या जगातील अत्यंत घातक आणि भयानक लोकांपैकी एक आहे.
advertisement
मुंबई पोलिसांचा 405 पानी आरोपपत्र
मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या 405 पानी आरोपपत्रात राणाचे नाव स्पष्टपणे नमूद आहे. राणाने डेव्हिड कोलमन हेडलीला मदत केली. ज्याने 26/11 च्या हल्ल्यापूर्वी मुंबईत रेकी करून आवश्यक माहिती पुरवली. हेडली आणि राणा यांनी मिळून हल्ल्याचे स्थळ, रचना आणि योजनेचा आराखडा तयार केला होता.
26 नोव्हेंबर 2008 पासून 29 नोव्हेंबरपर्यंत मुंबईवर 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला हल्ला ही भारतातील एक भीषण घटना होती. त्यामध्ये 166 लोक ठार झाले. ज्यात अनेक परदेशी नागरिक होते आणि 300 हून अधिक जखमी झाले. छत्रपती शिवाजी टर्मिनस, ताजमहल हॉटेल, ओबेरॉय ट्रायडेंट, नरीमन हाऊस अशा अनेक ठिकाणांवर हे हल्ले झाले.
