TRENDING:

Birthday ला तरुणीने असं काम केलं की मालामाल झाली; 18 व्या वयातच बनली तब्बल 3 अब्ज रुपयांची मालकीण

Last Updated:

आजोबा आणि वडिलांच्या सल्ल्याने 18 व्या वाढदिवशी तरुणीनं असं काही केलं की तिचं नशीब फळफळलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
उटावा : बर्थडे आला की कुणीतरी आपल्याला गिफ्ट द्यावं, सरप्राइझ द्यावं, आपला बर्थडे खास असावा असं अनेकांना वाटतं. काही जण तर आपल्या बर्थडेसाठी इतके उत्साही असतात की स्वतःचा बर्थडे स्वतःच खास बनवण्यासाठी प्रयत्न करतात. तुम्हीही तुमच्या वाढदिवसाला काही ना काही खास करत असाल. अशाच एका तरुणीने तिच्या वाढदिवसाला खास करण्यासाठी असं काम केलं की ती मालामाल झाली. वयाच्या अठराव्या वर्षातच ही तरुणी अब्जाधीश बनली आहे.
प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
advertisement

कॅनडात राहणारी ज्युलिअट लॅमॉर. नुकतीच अठऱा वर्षांची झाली आहे. तिने आपला वाढदिवश खास बनववावा म्हणून तिच्या आजोबांनी तिला एक सल्ला दिला. तिने आजोबांचं ऐकलं आणि तिनं ते कामही केलं. या कामात तिला तिच्या वडिलांनीही मदत केली. त्यानंतर तिचं नशीबच फळफळलं. तिने तब्बल 3 अब्ज रुपये जिंकले आहेत. आता तरुणीने वाढदिवशी नेमकं केलं तरी काय की ती एकाच फटक्यात तिला इतके पैसे मिळाले, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.

advertisement

Viral Video: 106 व्या वर्षी आजोबांनी केलं हे काम, भलेभलेही करायला घाबरतील

आजोबांनी दिला सल्ला

ज्युलिअटच्या आजोबांनी तिला तिचा बर्थडे अविस्मरणीय बनवण्यासाठी लॉटरी तिकीट खरेदी करण्याचा सल्ला दिला. ज्युलिअटने याआधी कधीच लॉटरी तिकीट खरेदी केलं नव्हतं. पण तरी आजोबांनी सांगितल्यानंतर त्यांचं मन राखण्यासाठी म्हणून ती लॉटरी खरेदी करायला गेली. पण लॉटरी तिकीट खरेदी करताना तिचा गोंधळच उडाला. तेव्हा तिने आपल्या वडिलांना फोन केला. तिच्या वडिलांनी तिला LOTTO 6-49 क्विक पिक घ्यायला सांगितलं. तिने तेच केलं आणि ते लॉटरी तिकीट तिला लागलं.

advertisement

पहिलंच लॉटरी तिकीट जिंकली

तिच्या वाढदिवशी तिच्या आयुष्यातील पहिलं लॉटरी तिकीट आणि ते ती जिंकलीसुद्धा. डेली मेलच्या रिपोर्टनुसार 19 वर्षांच्या ज्युलिएटने 48 मिलियन कनेडियन डॉलर म्हणजे जवळपास 2.9 अब्ज रुपये जिंकले. यासोबतच कॅनडात सर्वात कमी वयात सर्वात मोठी लॉटरी जिंकण्याचा रेकॉर्डही तिने आपल्या नावे केला आहे.

ती म्हणाली, “आज मी अब्जाधीश आहे. मला विश्वासच बसत नाही आहे की मी लॉटरीत इतके पैसे जिंकले आहे. माझी पहिली लॉटरी तिकीटवर गोल्ड बॉल जॅकपॉट माझ्या नावावर केलं आहे”

advertisement

Dream11 ची दुसरी बाजू, लोक तर करोडपती बनतात पण एका दिवसात किती पैशांचा लागतो डाव, कंपनी किती कमावते?

तुमच्या वाढदिवसाचा असा काही किस्सा असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या/Viral/
Birthday ला तरुणीने असं काम केलं की मालामाल झाली; 18 व्या वयातच बनली तब्बल 3 अब्ज रुपयांची मालकीण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल