19 मिनिटांचा व्हिडिओ, ज्याला सापडला त्याने तो मोठ्या प्रमाणात शेअर केला. अनेक लोक इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करणाऱ्या आणि साम्य असलेल्या चेहऱ्याच्या मुलींना टार्गेट करत आहेत आणि त्यांच्या अकाऊंट्सवर अत्यंत वाईट कमेंट्स करत आहेत.
इंटरनेटवर सर्च करताना 404 Not Found दिसणं म्हणजे काय, हा एरर कसला, दिसलं की काय करायचं?
advertisement
रील बनवणाऱ्या अनेक तरुणींना या व्हिडिओमधील व्यक्तींशी साम्य असल्याच्या कारणावरून सोशल मीडियावर बदनामी आणि अश्लील कमेंट्सचा सामना करावा लागत आहे. व्हिडिओ खुलेआम मागितला जात आहे, त्यासाठी लोक 500 ते 5000 रुपयांपर्यंतचे पैसे देण्याचे दावेही करत आहेत, जे कायद्याचं गंभीर उल्लंघन आहे.
पहिला व्हिडिओ लीक झाल्यानंतर बरेच लोक एआयने तयार केलेले भाग 2 आणि भाग 3 चे व्हिडिओ देखील शेअर करत होते. पण आता एका पोलीस अधिकाऱ्याने याचे परिणाम काय होतील ते सांगितलं आहे. इन्स्टाग्रामवर ही रील पोस्ट करताना @vardiwala0007 नावाच्या हँडलने लिहिलं की, "भारतीय पोलिसांकडून तातडीने संदेश."
जे लिहिलं तेच घडलं! सोशल मीडिया पोस्ट केली आणि इन्फ्लूएन्सरला मृत्यूने गाठलं
पोलिसाने सांगितलं, 'व्हायरल होत असलेला 19 मिनिटांचा व्हिडिओ हा एआय जनरेटेड व्हिडिओ आहे. जर तुम्हाला व्हिडिओ एआय जनरेटेड आहे की नाही हे देखील तपासायचं असेल, तर siteengine.com ही एक साइट आहे, तुम्ही त्यावर जाऊन ते तपासू शकता.'
पोलिसांनी पुढे म्हटलं आहे की, "जर तुम्ही असे व्हिडिओ कोणासोबत शेअर केले तर तुमच्यावर आयटी कायद्याच्या कलम 67, 67अ आणि 66 अंतर्गत खटला चालवला जाऊ शकतो. यामुळे दंड आणि 3 वर्षांपर्यंतची जेल होऊ शकते. कारण एखाद्याच्या गोपनीयतेचे उल्लंघन केल्याने किंवा असे व्हिडिओ शेअर केल्याने तुमच्याविरुद्ध खटला भरला जाऊ शकतो."
