इंटरनेटवर सर्च करताना 404 Not Found दिसणं म्हणजे काय, हा एरर कसला, दिसलं की काय करायचं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Error Code 404 Not Found : इंटरनेटवर ब्राउझ करताना अनेकदा 404 Not Found असा एरर कोड दिसतो. अनेक युझर्सना हा एरर पाहून आश्चर्य वाटतं की नेमकं काय चूक झालं.
advertisement
advertisement
404 एरर हा क्लायंट-साइड एरर म्हणून ओळखला जातो. म्हणजे समस्या सहसा युझर्सच्या बाजूने असते. उदा. चुकीचा URL किंवा पेज काढून टाकल्यामुळे निर्माण होतं, सर्व्हर बंद असल्यामुळे नाही. 404 एरर येण्याची सर्वात सामान्य कारणं म्हणजे URL टायपिंगमध्ये चूक, पेज डिलीट किंवा हलवलेलं असणं, ब्रोकन लिंक किंवा वेबसाईट रिमॉडेलिंग.
advertisement
advertisement
404 एरर दिसल्यास काही सोपी पद्धत वापरून समस्या तपासता येते. सर्वप्रथम URL नीट टाइप झालाय का हे पाहावं. वेबसाईटच्या होमपेजवर जाऊन पाहिजे ते पेज शोधण्याचा प्रयत्न करावा. ब्राउझरचे कॅशे किंवा कुकीज क्लिअर करणंदेखील उपयोगी ठरते. जर लिंक खूप जुन्या लेखात दिलेली असेल, तर पेज प्रत्यक्षात हटवलेलेही असू शकते.
advertisement


