कन्नौजच्या सराय मीरा क्षेत्रातील देवीन टोला मोहल्ल्यातील ही प्रेमकहाणी. इथल्या इंद्रा गुप्ता यांची मुलगी शिवांगी लहानपणापासूनच मुलांसारखी वागायची. तिला मुलीपेक्षा मुलांसारखं राहायला आवडायचं. ती आपल्या वडिलांसोबत दुकानदारी करायची.
55 लाख खर्च केले, लग्नाचा पोशाखही शिवला, पण वधू झाली गायब, सत्य कळलं अन्...
एक दिवस ज्योती नावाची एक मुलगी दुकानवर आली. शिवांगी आणि ज्योती या दोघींमध्ये मैत्री झाली. कालांतराने ही मैत्री प्रेमात बदलली. पण समाजातील रूढीवादी विचारांमुळे त्यांना एकत्र येणे शक्य नव्हतं. म्हणून शिवांगीने एक मोठा निर्णय घेतला. तिने पुरुष बनण्याचा निर्णय घेतला. दिल्लीला जाऊन तिने सर्जरी करून स्वतःला पुरुष बनवले. या सर्जरीसाठी तिला 7.50 लाख रुपये खर्च आले.
advertisement
शिवांगी आणि ज्योतीने दोघींनी आपल्या कुटुंबियांना आपल्या प्रेमाबाबत आणि एकमेकींशी लग्न करायचं असल्याबाबत सांगितलं. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी आपापल्या मुलांशी चर्चा करून एकमेकांच्या सहमतीने त्यांचं लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्याही कुटुंबांनी या विवाहाला मान्यता दिली आणि हिंदू रीती-रिवाजांनुसार त्यांचा विवाह झाला.
Chanakya Niti : बायकोला खूश कसं करायचं? चाणक्य यांनी सांगितला सोपा फंडा
हे प्रकरण व्हायरल झाल्यावर संपूर्ण जिल्ह्यात ही प्रेमकथा चर्चेचा विषय बनली. तथापि, लोकल 18 या व्हायरल व्हिडीओची पुष्टी करत नाही. या प्रकरणी शिवांगी उर्फ रानूशी बोलताना तिने सांगितलं की तिने आपल्या कुटुंबीयांच्या मान्यतेने हे पाऊल उचललं आहे आणि आपल्या प्रेमासाठी तिने पुरुष बनण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्यावर आतापर्यंत तीन ऑपरेशन्स झाले आहेत आणि चौथं ऑपरेशन बाकी आहे.