1941 आणि 2025 चं कॅलेंडर एकसारखं आहे. अगदी त्याच तारखा आणि तोच दिवस. खाली आम्ही या दोन वर्षांचे कॅलेंडर देत आहोत. म्हणून जर तुम्ही 1941 च्या कॅलेंडरकडे पाहिलं तर 2025 च्या कॅलेंडर सारखंच दिसेल ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 1941 आणि 2024 ही दोन्ही लीप वर्षे नाहीत. दोन्हीमध्ये 1 जानेवारी बुधवारी येतो.
advertisement
हे कसं शक्य आहे?
पण जर तुम्हाला वाटत असेल की हे पहिल्यांदाच घडलं आहे, तर तसं नाही. दर काही दशकांनी एका वर्षाचं कॅलेंडर जुन्या वर्षाशी जुळू शकतं म्हणजेच, तोच दिवस आणि तारीख एकाच दिवशी येऊ शकते. गेल्या 100 वर्षात असं किती तरी वेळा झालं आहे की, मागील वर्षांचं कॅलेंडर त्यानंतरच्या वर्षांसारखंच होतं.
Iran Israel Pizza : पिझ्झा जास्त विकला गेला आणि युद्ध झालं, इराण-इस्राइल वॉरशी याचा काय संबंध?
ग्रेगोरियन कॅलेंडरमधील आठवड्याचे दिवस आणि तारखा या चक्रात पुनरावृत्ती होतात. असंही म्हटलं जातं की हे लीप वर्षाच्या पॅटर्नमुळे आणि 7 दिवसांच्या आठवड्याच्या चक्रामुळे आहे. दरवर्षी 1 जानेवारी हा दिवस एक दिवस पुढे सरकतो. एक लीप वर्ष दर 4 वर्षांनी एकदा या क्रमाला आणखी पुढे नेतो. म्हणून जुना कॅलेंडर पॅटर्न दर 5-11 वर्षांनी पुनरावृत्ती होतो. लीप वर्षाचं कॅलेंडर नेहमीच लीप वर्षाच्या कॅलेंडरशी जुळतं. लीप नसलेल्या वर्षाचे कॅलेंडरदेखील अशा वर्षांमध्ये पुनरावृत्ती होते जे लीप वर्ष नसतात.
1941 आणि 2025 सालातील घटनाही सारख्याच?
या कॅलेंडरमध्ये फक्त तारखांची समानताच नाही तर या दोन्ही वर्षांत घडणाऱ्या घटनाही सारख्याच आहेत. जणू 1941 सालच्या इतिहासाची पुनरावृत्तीच 2025 मध्ये होते आहे. हे पाहण्यासाठी दोन्ही वर्षांच्या घटनांवर एक नजर टाकूया.
1941 सालातील घटना
– हे वर्ष दुसऱ्या महायुद्धाचे निर्णायक आणि भयानक वर्ष होते.
– जर्मनीने सोव्हिएत युनियनवर हल्ला केला.
– जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला आणि अमेरिका युद्धात उडी घेतली.
– युद्धाच्या ज्वाला युरोप, आफ्रिका आणि आशियामध्ये पसरल्या होत्या.
– म्हणजेच जगातील दोन मोठ्या महासत्ता, सोव्हिएत युनियन आणि अमेरिका या युद्धात थेट सहभागी होत्या.
– दुसऱ्या महायुद्धाचा आशिया आणि युरोपवर मोठा परिणाम झाला. यानंतर अनेक देशांचे नकाशे बदलले. – अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल झाला. हे आर्थिक मंदीचे वर्ष मानलं गेलं.
2025 वर्ष आतापर्यंतच्या घटना
या वर्षीही जग अनेक संकटांना तोंड देत आहे. विशेषतः युद्धासारख्या परिस्थिती. गेल्या काही दशकांमध्ये अशा युद्धासारख्या परिस्थिती कधीही पाहिल्या नव्हत्या.
Plane Secret : विमानाच्या टेस्टसाठी इंजिनमध्ये टाकतात कोंबडी, पण जिवंतच का, मृत का नाही?
– रशिया-युक्रेन युद्ध : या दोन्ही देशांमधील युद्ध तीन वर्षांपासून सुरू आहे. या वर्षी त्याचे संकट अधिकच वाढलेले दिसते.
– भारत-पाकिस्तान लष्करी संघर्ष : या वर्षी पहलगाममधील दहशतवादी घटनेनंतर, मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी संघर्ष झाला. दोन्ही देशांनी चार दिवसांनी युद्धबंदी केली.
– इस्रायल-हमास-हिजबुल्लाह संघर्ष : वर्षाच्या सुरुवातीला, असं दिसून आलं की इस्रायलने गाझा पट्टीतून हमास आणि लेबनॉनच्या सीमेला स्पर्श करणाऱ्या भागात हिजबुल्लाहचा नाश केला. ज्यामुळे अनेक वर्षे अशांतता पसरत होती.
– इराण-इस्रायल संघर्ष : जूनमध्ये इस्रायलने थेट इराणवर हवाई हल्ला केला. इराणने याला प्रत्युत्तर दिलं. दोघांमधील हा संघर्ष सहाव्या दिवशीही सुरूच आहे. अमेरिका देखील या संघर्षात सहभागी असल्याचं दिसतं.
या वर्षीही रशिया आणि अमेरिका या दोन महासत्तांनी युद्धात उडी घेतली आहे. रशिया थेट युक्रेनशी युद्ध लढत आहे, तर अमेरिका मागून इस्रायल आणि इराणमधील संघर्षात सहभागी आहे आणि आता उघडपणे येऊन इराणविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
- भारत, पाकिस्तान, इराण आणि इस्रायल हे आशियाई देश याचा परिणाम करतात. या वर्षीही आर्थिक मंदीचे संकेत येऊ लागले आहेत.
2025 मध्ये 1941 च्या इतिहासाची पुनरावृत्ती?
अर्थात, दोन्ही वर्षांत जागतिक अस्थिरता आणि युद्धसदृश परिस्थिती आहे, परंतु घटनांचे प्रमाण आणि स्वरूप वेगळे आहे. त्यांना एकाच पद्धतीने एकत्र पाहता येत नाही. हे देखील निश्चित आहे की इतिहासातील घटनांचा संपूर्ण क्रम पुनरावृत्ती होत नाही, परंतु काही नमुने आणि परिस्थिती वेळोवेळी सारख्याच दिसतात. जर असा व्हिडिओ व्हायरल होत असेल आणि त्यातील घटना समान दिसत असतील, तर त्यासाठी कोणताही तर्क किंवा वैज्ञानिक आधार नाही.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे, जी फक्त माहिसाठी देण्यात आली आहे. अशा दाव्याचं समर्थन करणं किंवा प्रोत्साहन देण्याचा उद्देश न्यूज18 मराठीचा नाही.)
