बिहारच्या मुजफ्फरपूरमधील ही घटना आहे. राजा प्रशांत राम उर्फ रिकी कुमार हा 21 वर्षांचा मुलगा वैशाली जिल्ह्यातील पाटेपूर येथील रहिवासी आहे, तो बरियारपूर पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात त्याच्या चुलत भावाच्या घरी आला होता. जिथं त्याची प्रेयसीही राहत होती, जी अल्पवयीन आहे. संपूर्ण गाव झोपल्यानंतर रात्रीच्या अंधारात दोघंही एकमेकांना भेटले. संपूर्ण रात्र दोघांनी एकत्र घालवली. रात्रभर रोमान्स केला. पण दुसऱ्या दिवशी सकाळी असं काही घडलं की कुणी विचारही केला नसेल.
advertisement
प्रेम आणि हृदयाचं असंही कनेक्शन! आठवड्यातून इतक्या वेळा लैंगिक संबंध, हार्ट अटॅकचा धोका कमी करतं
गावातील काही लोकांनी दोघांनाही आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. गावकरी लगेच संतापले, त्यांनी सगळ्यात आधी त्या मुलाला मारहाण केली आणि नंतर दोन्ही प्रेमींना त्यांची संमती न घेता त्यांचं लग्न लावून दिलं. जेव्हा मुलाच्या वडिलांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांनी सांगितले की हा बालविवाह आहे. जो कायदेशीर गुन्हा आहे. त्यांनी तात्काळ बरियारपूर पोलीस स्टेशन गाठले आणि सहा जणांविरुद्ध अपहरण करून बालविवाह करण्यास भाग पाडल्याबद्दल तक्रार दाखल केली. तक्रारीत मुलीच्या वडिलांचंही नाव आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली आणि मुलगा-मुलगी दोघांनाही ताब्यात घेतलं. सध्या दोघांचंही समुपदेशन सुरू आहे.
प्रेम आणि हृदयाचं असंही कनेक्शन! आठवड्यातून इतक्या वेळा लैंगिक संबंध, हार्ट अटॅकचा धोका कमी करतं
पोलिसांच्या माहितीनुसार, लग्नाला भाग पाडणारे सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलीस पथकं छापे टाकत आहेत. हे प्रकरण बालविवाहाशी संबंधित असल्याने ते गांभीर्याने घेतलं जात आहे. दोन्ही अल्पवयीन मुलांची चौकशी केली जात आहे आणि प्रकरणाच्या प्रत्येक पैलूचा तपास केला जात आहे, असं पोलिसांचं म्हणणे आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणात कोणालाही अटक केलेली नाही.
या संपूर्ण प्रकरणावर ठाणेदार चांदनी सांवरिया म्हणाल्या की, एका किशोरवयीन मुलीचे जबरदस्तीने एका तरुणाशी लग्न लावलं जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. दोघांनाही पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.