TRENDING:

Video: शांत समुद्रात घडला थरारक प्रसंग, २४ वर्षीय तरुणाला व्हेलने गिळले, नंतर...; वडिलांसमोर झाली घटना

Last Updated:

Viral Video: वडिलांसमोर एका २४ वर्षीय तरुणाला व्हेलने गिळल्याची थरारक घटना समोर आली आहे. हा संपूर्ण प्रसंग त्याच्या वडिलांनी कॅमेऱ्यात कैद केला, ज्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सान्तियागो: चिलीच्या बहिया एल अग्विला येथे कायाकींग करणाऱ्या 24 वर्षीय तरुणाला एका प्रचंड हंपबॅक व्हेल (बालीन व्हेलची एक प्रजाती,लांबी 14-17 मीटर आणि वजन 40 मेट्रिक टन पर्यंत)ने गिळल्याची थरारक घटना समोर आली आहे.हा संपूर्ण प्रसंग त्याच्या वडिलांनी कॅमेऱ्यात कैद केला, ज्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
News18
News18
advertisement

शांत समुद्र प्रवासातून थरारक प्रसंग

एड्रियन सिमँकास आणि त्यांचे वडील डेल हे बहिया एल अग्विला येथे सँ इसिड्रो लाइटहाउसजवळ कायाकींग करत असताना अचानक एक भलीमोठी हम्पबॅक व्हेल समुद्राच्या पृष्ठभागावर आली आणि तिने एड्रियनला गिळले. डेल केवळ काही मीटर अंतरावर होते आणि त्यांनी हा धक्कादायक क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपला.

बँक बंद पडल्यास ग्राहकांना किती पैसे परत मिळतात? 

advertisement

डोळे उघडले तेव्हा मी व्हेलच्या तोंडात होतो

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत एड्रियन म्हणाला, माझ्या मागून काहीतरी जोरात आदळले आणि मी बुडत गेलो. मी डोळे बंद केले आणि पुन्हा उघडल्यावर लक्षात आले की मी एका व्हेलच्या तोंडात आहे. मला चेहऱ्यावर चिकट पदार्थाचा स्पर्श जाणवला. भोवती फक्त गडद निळा आणि पांढरा रंग दिसत होता. मी विचार केला की जर व्हेलने मला पूर्णपणे गिळले तर मी काहीही करू शकत नाही. पुढे काय करायचे याचा विचार करू लागलो.

advertisement

2008 पेक्षा वाईट ठरू शकते 2025! गुंतवलेले पैसे आताच काढून घ्या, नाही तर...

केवळ दोन सेकंदांत वाचला जीव

एड्रियनला काही क्षण कळलेच नाही की तो नक्की कुठे आहे, पण त्याआधीच व्हेलने त्याला दोन सेकंदांत पाण्यात परत बाहेर टाकले. मी दोन सेकंद पाण्याबाहेर उडालो आणि मग लक्षात आले की मी जिवंत आहे, असे एड्रियनने सांगितले.

advertisement

महाकुंभच्या Net Profitचा आकडा समोर आला, सर्वांना चक्रावून टाकले

...याची अधिक चिंता वाटत होती

एड्रियनने सांगितले की,त्याला आपला जीव जाईल असे वाटले होते.पण व्हेलच्या तोंडातून सुटल्यावर भीती वाटली की व्हेल त्याच्या वडिलांवर हल्ला करेल किंवा थंड पाण्यात राहिल्याने ते गारठून मरतील.मात्र काही क्षणांनी तो वडिलांच्या कायाकींगपर्यंत पोहोचले आणि सुरक्षित किनाऱ्यावर परतले.

advertisement

अनुभवाने दिली दुसरी संधी!

या थरारक घटनेचा व्हिडिओ पाहून स्वतः एड्रियन शॉक झाला. व्हिडिओ पाहिल्यावर मला जाणवले की ती व्हेल किती प्रचंड होती. जर मी तिला आधी पाहिले असते, तर कदाचित अजूनच घाबरलो असतो, असे तो म्हणाला.

या धक्कादायक घटनेनंतरही एड्रियन आणि त्यांचे वडील डेल यांनी कयाकिंग थांबवण्याचा विचार केला नाही. एड्रियन यांनी सांगितले की, ही एक अद्वितीय घटना होती, जणू मला जीवनाची दुसरी संधी मिळाली आहे. आणि मी ती संधी पूर्णपणे उपयोगात आणणार आहे!

मराठी बातम्या/Viral/
Video: शांत समुद्रात घडला थरारक प्रसंग, २४ वर्षीय तरुणाला व्हेलने गिळले, नंतर...; वडिलांसमोर झाली घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल