महाकुंभच्या Net Profitचा आकडा समोर आला, सर्वांना चक्रावून टाकले; सरकारला मिळाले इतके लाख कोटी!

Last Updated:

Mahakumbh 2025: उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभवर मोठा खर्च केल्याचा वाद झाला होता. यावर आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर दिले आहे. ५० ते ५५ कोटी श्रद्धाळूंच्या उपस्थितीमुळे राज्य सरकारला मोठा नफा झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

News18
News18
लखनऊ: उत्तर प्रदेशातील महाकुंभासाठी योगी सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केले. यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती.महाकुंभ हा केवळ ब्रँडिंगचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मात्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावर प्रत्युत्तर देत महाकुंभामुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा झाल्याचा दावा केला आहे. लखनऊच्या विकासासाठी 1,000 कोटींपेक्षा जास्त निधीच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले आहे. तेव्हा त्यांनी महाकुंभ मेळ्यातून झालेल्या फायद्याबद्दल सांगितले.
महाकुंभातील गर्दीचा विक्रम
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, प्रयागराज महाकुंभात एका महिन्यात तब्बल ५० कोटी श्रद्धाळूंनी स्नान केले. हे भाविक 'एक भारत, श्रेष्ठ भारत'चा संदेश घेऊन गेले आहेत. महाकुंभासाठी १५,००० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असला तरी त्याचा परिणामस्वरूप उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला तब्बल ३ लाख कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे.
advertisement
इंग्रजांनी लूट केली नसती तर आज भारत किती श्रीमंत असता? रक्कम वाचून डोळे गरगरतील
५० ते ५५ कोटी श्रद्धाळूंच्या उपस्थितीमुळे राज्यातील विविध उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळाली. महाकुंभाच्या नावाने मिळालेल्या निधीचा उपयोग फक्त कुंभासाठीच नाही, तर प्रयागराजच्या सौंदर्यीकरणासाठीही करण्यात आला, असेही मुख्यमंत्री योगी यांनी सांगितले.
advertisement
गडकरींना दिले श्रेय
महाकुंभ काळात देशभरातून मोठ्या संख्येने भाविक आले. रेल्वे आणि विमानतळावरील व्यवस्थेसोबतच रस्ते वाहतुकीसाठीही उत्तम सोय करण्यात आली होती. याचे संपूर्ण श्रेय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाते. हे फक्त डबल इंजिन सरकारमुळेच शक्य झाले," असे मुख्यमंत्री योगी यांनी स्पष्ट केले.
advertisement
महाकुंभ –विकास आणि श्रद्धेचा संगम
योगी सरकारचा दावा आहे की, महाकुंभ हा केवळ धार्मिक नव्हे, तर आर्थिकदृष्ट्याही महत्त्वाचा ठरला आहे. विरोधक सरकारवर टीका करत असले, तरी मोठ्या प्रमाणावर भाविकांनी महाकुंभाला दिलेल्या प्रतिसादामुळे उत्तर प्रदेशच्या विकासाला चालना मिळाल्याचा सरकारचा दावा आहे.
मराठी बातम्या/मनी/
महाकुंभच्या Net Profitचा आकडा समोर आला, सर्वांना चक्रावून टाकले; सरकारला मिळाले इतके लाख कोटी!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement