तुम्हाला माहिती असेल हिंदू लग्नात एक परंपरा आहे. मामाकडून भाचाभाचीला त्यांच्या लग्नात आहेर दिला जातो. राजस्थानमध्ये हा आहेर मायरा म्हणून ओळखला जातो. इथल्या नागौरमधील आहेर अधिक चर्चेत असतो कारण तो लाखो, कोट्यवधींमध्ये असतो. नुकतंच आता तीन मामांनी त्यांच्या भाचाभाचीच्या लग्नात तब्बल 3 कोटींचा आहेर दिला आहे. त्यामुळे हे लग्न चर्चेत आलं आहे.
advertisement
स्वतःच्या लग्नात मेहुणीने दाजीसोबत दिली अशी पोझ, फोटो पाहून पोलीसही हादरले, होणार अटक
नागौर शहरातील हनुमान बागमध्ये राहणारे रामबक्स खोजा एक शेतकरी आहेत. त्यांना 3 मुलं आणि एक मुलगी आहे. त्यांची दोन मुलं हरनीवास आणि दयाल सरकारी शिक्षक आहेत तर हरचंद हा प्रायव्हेट कंपनीत काम करतो. त्यांची एकुलती एक मुलगी बिराजया देवी जिचं लग्न फरडौदमधील मदनलालशी झालं आहे, ते एक शिक्षक आहेत. बिराजया देवी आणि मदनलाल यांना एक मुलगा आणि एक मुलगी. त्या दोघांचंही लग्न होतं.
आपल्या बहिणीच्या मुलांचं म्हणजे भाचाभाचीचं लग्न म्हणून तीन मामांनी मिळून 3 कोटी रुपयांचा मायरा दिला आहे. यात एक कोटी 51 लाख रुपयांची रोख रक्कम, 30 तोळं सोनं, 5 किलो चांदी आणि 2 प्लॉटचा समावेश आहे. कुटुंब, नातेवाईक, पाहुणे अशा 2000 लोकांना ते सोबत घेऊन गेले आणि मायरा भरला.
बायकोसोबत हसत-हसत महाकुंभात गेला, एकत्र मारली डुबकी, पाण्याबाहेर रडत आला नवरा, घडलं काय?
मायरा हा भावाकडून बहिणीच्या मुलांना त्यांच्या लग्नात दिला जातो. यात दागिने, कपडे, कॅश, गाडी, जमीन, मिठाई अशा गिफ्टचा समावेश असतो. जो तो आपल्याला जमेल तसा मायरा देतो.
मायरा म्हणजे भावा-बहिणीच्या नात्याचं प्रतीक मानलं जातं. भावाबहिणीच्या नात्यातील प्रेम दर्शवतं. या माध्यमातून भाऊ आपल्या बहिणीच्या आणि कुटुंबाच्या आनंदाची काळजी घेतो. भाचाभाचींसाठी हा मामाचा आशीर्वाद असतो. भाचाभाचीच्या लग्नात मामाकडून ही आर्थिक मदत असते.