पण या आधुनिक युगात हरियाणातील एका आजीनं वयाच्या 77 व्या वर्षीदेखील अशी काही जिद्द आणि फिटनेस दाखवली आहे की ती सोशल मीडियावर स्टार बनली आहे. ‘देसी दादी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरियाणाच्या सबों दादी यांचा फिटनेस पाहून तरुणाईही थक्क झाली आहे.
सबों दादी यांना पोहायला सुरुवात वयाच्या 10 व्या वर्षीच केलं होतं. गावातल्या नहरमध्ये त्यांनी पोहणं शिकून ते त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवलं. आजही त्या दररोज सकाळी लवकर उठून पोहायला जातात, कसरत करतात आणि पारंपरिक पद्धतीने स्वतःला तंदुरुस्त ठेवतात.
advertisement
दादींच्या आयुष्यात अनेक रोमांचक अनुभव आहेत. त्यांनी स्वतः गंगा नदी पार केली असून आतापर्यंत तीन जणांचे त्यांनी प्राण वाचवले आहेत. त्यांच्या या पराक्रमांची गोष्ट आता गावातील लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी प्रेरणा बनली आहे.
दादींचा नातू चिरांग यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता, ज्यामध्ये त्या पोहताना आणि व्यायाम करताना दिसत होत्या. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि लोकांनी त्यांना ‘देसी मोटिवेशन’ आणि ‘फिटनेस आयकॉन’ असं म्हणायला सुरुवात केली.
दादीच्या मते, आजची तरुण पिढी फास्ट फूड आणि मोबाईलमध्ये इतकी गुंतली आहे की ते आपली जीवनशैली विसरले आहे. त्या म्हणतात, "देसी घी, सरसोचं तेल, हिरव्या भाज्या आणि शुद्ध गहू हेच खरी आरोग्यदायी जीवनशैली आहे." त्यांच्या मुलानंही सांगितलं की, त्यांच्या घरात खास गहू पेरला जातो, जो फक्त दादी आणि नातवांसाठी वापरला जातो.
या वयात जिथे अनेकांसाठी चालणं ही कठिण होतं, उठबस करणं ही कठिण होतं, त्या काळात सबों दादी पोहतात, व्यायाम करतात आणि आरोग्यपूर्ण जीवन जगतात. गावातील लोक त्यांचं अनुकरण करतात. या दादीला सोशल मीडियावर "हरियाणाची फिटनेस क्वीन" म्हणून देखील बोललं जातं.
