झारखंडच्या सरायकेला-खरसावा जिल्ह्यात एक जावयांचं गाव आहे. याच कारणामुळे या गावाचं नाव जमाईपाडा असं पडलं आहे. इथे जावयाला ज्वाईं म्हटलं जातं. मात्र, बोलण्यासाठी सोपं असल्याने याचं नाव जमाईपाडा असं झालं. नवरदेव सासरी येण्याच्या या परंपरेची सुरुवात 1982 मध्ये झाली. अमूल्यो प्रधान नावाच्या व्यक्तीचं आपल्या मुलीवर खूप प्रेम होतं.
रात्री गुपचूप विवाहित प्रेयसीच्या खोलीत घुसला पोलीस; पण दिराने पाहिलं अन् मिळाली आयुष्यभराची शिक्षा
advertisement
याच कारणामुळे त्यांनी जावयालाच आपल्या घरी आणलं. त्यांच्या संसारात काही अडचणी किंवा समस्या येऊ नये, म्हणून त्यांना वेगळी जमीन देऊन घर दिलं. हे पाहून गावातील इतर लोकांनीही जावयाला आपल्याच गावात बोलवून राहायला लावलं. पाहता पाहता अनेक जावई येऊन या गावात राहू लागले. जावयांचं घर वेगळ्याभागांमध्ये असल्यानं या गावाला जमाईपाडा असं नाव पडलं
आता या गावात जवळपास 200 कुटुंब आहेत. इथे अनेक इतर लोकही जमीन खरेदी करून राहण्यासाठी आले आहेत. मात्र, आता सगळं बदललं आहे. आता गावकऱ्यांचं म्हणणं आहे, की आता इथे असं काहीही होत नाही. त्यामुळे आम्हाला गावाचं नाव बदलून लक्ष्मी नगर करायचं आहे.