कोल्हापूर : विधायक.. भरभक्कम शरीरयष्टी, वजन तब्बल दीड टन, त्याला महिन्याकाठी एक लाखांचा नुसता खुराकच लागतो.. खाण्यापिण्या आणि आंघोळीसाठी दोघ देखरिकीला.. आणि इतकंच नव्हे तर त्याला कुठंही फिरण्यासाठी एसी वाहनाची खास सोय केली जाते. एखाद्या आमदाराची बडदास्तला शोभेल अशी साजेशी सोय या विधायकाची केली जाते.. हे वर्णन आहे भीमा कृषी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या हरियाणामधील पानिपत जिल्ह्यातील नरेंद्र सिंह यांच्या 'विधायक' रेड्याचं.. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या भीमा कृषी प्रदर्शनामध्ये विधायक नावाचा रेडा सहभागी झालाय. हा या कृषी प्रदर्शनाचं खास आकर्षण ठरलाय.
advertisement
भीमा कृषी प्रदर्शनात या विधायकला बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र कोल्हापुरात पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत या आमदारानं तब्बल सात वेळा राष्ट्रीय चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला आहे. दिवसभरातून तीन वेळा रेड्याला आंघोळ घातली जाते. आणि वातानुकूलित कक्षातच रेड्याची देखरेख केली जाते. जगातील सर्वात महागडा आणि महाकाय रेडा म्हणून या रेड्याची ओळख आहे.
एका एकरात अडीच लाखांच उत्पन्न काढलं, शेतकऱ्यानं नेमकं काय केलं?,Video
काय आहेत वैशिष्ट्ये ?
हा रेडा अवघा 4 वर्षांचा असून त्याचं वजन दीड टन आहे. त्याची उंची 6 फूट आणि लांबी 14 फूट आहे. या अवाढव्य आकारामुळे तो जगातील सर्वात मोठा रेडा मानला जातो. त्याची किंमत 25 कोटी रुपये आहे, खास सोयी आणि खुराक: आमदारला देशात कुठेही फिरण्यासाठी वातानुकूलित वाहनाची सोय करण्यात आली आहे, आणि त्याचा महिन्याचा खुराक एक लाख रुपये होतो. यामध्ये त्याला उच्च गुणवत्ता असलेले अन्न, दूध आणि चारा दिला जातो. हा रेडा जगातील सर्वात महागडा आणि महाकाय रेडा आहे, जो सात वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेला आहे. आमदार रेड्याला दिवसभरात 20 लिटर दूध, 20 किलो फिड आणि 30 किलो चारा आणि भुसा दिला जातो. या खुराकामुळे त्याची शरीरसंपदा आणि कार्यक्षमता उत्तम ठेवली जाते. रेड्याला दररोज तीन वेळा आंघोळ घातली जाते.
याची देखरेख करण्यासाठी विशेषतः दोन लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन कृषी उत्पादनं आणि पशुपालन क्षेत्रातील नवीनतम सुधारणा यासोबतच, आमदार रेडा या एकाच आकर्षणाने यंदाच्या कृषी प्रदर्शनात तुडुंब गर्दी पाहायला मिळत आहे. या रेड्याला पाहण्यासाठी कोल्हापूर आणि आसपासच्या भागातील शेतकरी, तसेच इतर कृषी प्रेमी उत्सुकतेने प्रदर्शनाला भेट देत आहेत.