एका एकरात अडीच लाखांच उत्पन्न काढलं, शेतकऱ्यानं नेमकं काय केलं?,Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी दिगंबर चव्हाण यांनी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे. यामधून त्यांना अडीच लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न मिळालं आहे.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : पारंपरिक शेतीपिकांच्या मागे न लागता प्रथमच वर्षी एका एकरात ड्रॅगन फ्रूटची लागवड करुन अडीच लाख रुपये पर्यंत उत्पन्न शेतकऱ्यानं घेतलं आहे. दिगंबर चव्हाण असे या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचे नाव आहे. तर ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी त्यांना एक ते दीड लाख रुपये पर्यंत खर्च आला आहे. या शेती संदर्भात अधिक माहिती शेतकरी दिगंबर चव्हाण यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
advertisement
सोलापूर जिल्ह्यातील वाफळे या गावातील शेतकरी दिगंबर चव्हाण यांनी जून 2023 मध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे. आपल्या जमिनीवर ड्रॅगन फ्रूटचं पिक येते का नाही, त्याचे व्यवस्थापन कसे आहे, खर्च किती येतो, उत्पन्न किती मिळतो हे यादी जाणून घेण्यासाठी त्यांनी एका एकरात 200 पोलवर ड्रॅगन फ्रूटची शेती केली. एका वर्षानंतर ना म्हणजेच जून 2024 रोजी ड्रॅगन फ्रूटच्या विक्रीतून शेतकरी दिगंबर चव्हाण यांना अडीच लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न मिळालं आहे.
advertisement
ड्रॅगनफ्रूट शेतीला चांगले दिवस आले असून चीनमधलं हे फळ आता कमी पाणी असलेल्या जमिनीत मुळ धरू लागलंय. इथल्या शेतकऱ्यांनी या फळाला आता स्विकारला असून सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकासोबत एखाद्या एकरात ड्रॅगनफ्रूट लागवड सुरु केलेली दिसते.
दिगंबर चव्हाण यांचे ड्रॅगन फ्रूट शेतात येऊन व्यापाऱ्यांनी खरेदी केली आहे. तसेच सोलापूरसह, पुणे, मुंबई, कोल्हापूर या ठिकाणी असलेल्या बाजारात ड्रॅगन फ्रूटची विक्री करत आहेत. होलसेल मार्केटमध्ये सरासरी 100 ते 150 रुपयांचा भाव त्यांना मिळाला आहे. ड्रॅगन फ्रूटची एकदा लागवड केल्यास दहा ते बारा वर्ष या शेतीतून शेतकरी दिगंबर चव्हाण यांना उत्पन्न मिळणार आहे. तसेच परिसरातील अनेक शेतकरी सध्या या ड्रॅगन शेतीला भेट देऊन दिगंबर चव्हाण यांच्याकडून माहिती जाणून घेत आहेत.
advertisement
शेतकऱ्यांनी या ड्रॅगन फ्रूटच्या शेतीकडे नक्कीच वळावे. कमी पाण्यामध्ये, कमी खर्चमध्ये येणारे पीक असून ड्रॅगन फ्रूटच्या शेतीतून हमखास उत्पन्न मिळेल, असा सल्ला शेतकरी दिगंबर चव्हाण यांनी दिला आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
February 23, 2025 12:12 PM IST