या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, एक युवकही जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हे प्रकरण दिल्लीतील करोल बाग भागातील आहे. येथील डीबीजी रोडवरील डोरीवलन परिसरात हा तरुण रात्री मित्रासोबत बोलत होता. यावेळी तो दुचाकीवर बसला होता. बोलत असताना अचानक दुचाकीवर बसलेल्या तरुणाच्या डोक्यात मोठी गोष्ट पडली. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
शेजारी उभ्या असलेला तरुण ही घाबरला, नक्की काय पडलं असं त्याला जाणवलं, नंतर पाहिले असता तो एसी असल्याचे त्याच्या लक्षात आले, जो तिसऱ्या मजल्यावरून थेट तरुणाच्या डोक्यावर पडला आणि त्याच्या मृत्यूचे कारण बनला.
या वेदनादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांचे म्हणणे समोर आले आहे. शनिवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाली. एका व्यक्तीवर एसी पडल्याचे सांगण्यात आले. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता, करोलबाग येथील डीजीबी रोड परिसरात दुसऱ्या मजल्यावरून बाहेरचा एसी तरुणावर पडल्याचे दिसून आले.
अपघातानंतर तरुणाला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. या अपघातात जितेश नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा तरुण प्रांशूवर उपचार सुरू आहेत. दोन्ही तरुणांची ओळख पटली आहे. 18 वर्षीय जितेश हा दोरीवालनचा रहिवासी होता, तर अपघातात जखमी झालेला 17 वर्षीय तरुण प्रांशु हा पटेल नगरचा रहिवासी होता.`
याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डीजीबी रोड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फॉरेन्सिक टीमने घटनेचा तपास केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.