एम्मा असं या महिलेचं नाव आहे. 41 वर्षीय एम्माचे दुसऱ्या पुरूषाशी प्रेमसंबंध होते. ती अॅलेक्स नावाच्या व्यक्तीला एक वर्षापूर्वी ऑनलाईन भेटली. दोघांमधील जवळीक वाढली आणि ते प्रेमात पडले. ती महिला रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काम करायची, ही गोष्ट नवऱ्याला त्रास देऊ लागली. ती अधूनमधून जिममध्ये जायची आणि तिथे तासन्तास घालवायची. अनेक वेळा तिला काही गूढ फोन कॉल्सही येत असत.
advertisement
लग्नानंतर नवऱ्यापासून दूर दूर रहायची बायको, कारण असं कुटुंबाला वाटू लागली लाज, पोलीसही शॉक
एम्माचा नवरा जोलाही संशय आला. एकदा त्याने एम्माला उघडपणे याबाबत विचारलंही. जोला त्याच्या पत्नीचे प्रेमसंबंध असल्याची खात्री झाली, म्हणून त्याने त्याच्या पत्नीचा पाठलाग करण्यासाठी एका खाजगी गुप्तहेराची नियुक्ती केली.
डिटेक्टिव्हही शोधू शकले नाही महिलेचं लफडं
एम्माला तिच्या गाडीचा पाठलाग करताना आणि एक माणून त्यांच्या ऑफिसभोवती वारंवार फिरताना दिसली. आपला कुणीतरी पाठलाग करत आहे हे तिला समजलं. ती त्या गुप्तहेरापेक्षा हुशार होती. तिने तिचं राहणीमान पूर्णपणे बदललं, जेणेकरून तिच्या पतीला त्याची थोडीशीही कल्पना येऊ नये. तिने एक बनावट ऑफिस प्रोजेक्ट तयार केला, ज्याद्वारे ती रात्री उशिरापर्यंत जागी राहायची. जेव्हा गुप्तहेरांना तिच्याविरुद्ध काहीही सापडलं नाही, तेव्हा त्यांनी त्याला क्लीन चिट दिली. नवऱ्यानेही एम्माची माफी मागितली.
बायकोच्या या अवयवाला स्पर्श करताच म्हणे नवऱ्यामागील साडेसाती दूर होते
मिरर वेबसाइटच्या वृत्तानुसार, एम्मा म्हणाली, तिच्या वैवाहिक जीवनात खूप दुःखी होती आणि ती तिच्या पतीपासून दूर जाऊ लागली होती. जेव्हा तिचे प्रेमसंबंध सुरू झाले तेव्हा तिला जिवंत वाटू लागलं, तिच्यात उत्साह वाढू लागला. ती तिचे प्रेमसंबंध चालू ठेवेल कारण ती अॅलेक्ससोबत आनंदी आहे.
जोडीदार विवाहबाह्य संबंधात आहे हे कसं ओळखावं?
आता जोडीदार एखाद्याच्या तिसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडलाच असेल किंवा त्याचे विवाहबाह्य संबंध असतील, तर ते ओळखायचे कसे? असा प्रश्न अनेकांना पडतो. तर याबद्दल काही मार्ग समोर आले आहेत. काही अनुभवी किंवा एक्पर्ट्स लोकांनी याबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत.
1) स्वतःकडे अधिक लक्ष देणं : जेव्हा पुरुष किंवा महिला प्रेमात असते किंवा एखाद्या नात्याची सुरुवात असते, तेव्हा ती व्यक्ती स्वतःकडे खूप लक्ष देते. त्याचं व्यक्तिमत्त्व आकर्षक करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे जर तुमचा नवरा किंवा बायको असं काही असेल तर त्यांच्या आयुष्यात कुणीतरी प्रवेश केल्याचं हे लक्षण असू शकतं.
2) तुमची तुलना करणं : जर तुमचा नवरा तुमची तुलना दुसऱ्या महिलेशी करत असेल किंवा या उलट बायको तसं करु पाहात असेल, तर समजून घ्या की त्याला किंवा तिला आता तुमच्यात उणिवा दिसू लागल्या आहेत. हे देखील एक लक्षण असू शकतं.
दररोज मध्यरात्री बेडरूममध्ये यायची सासू अन्..., सुनेनं VIDEO च शेअर केला, पाहणारा प्रत्येक जण थक्क
3) फोनला चिकटून राहणं : नवरा किंवा बायको बराच वेळ फोनवर असेल तर. तसेच आपला फोन एकटं सोडून कुठे जात नसेल, तर काहीतरी गडबड आहे हे समजून घ्या.
4) देहबोली बदलते : जर तुमचा जोडीदार विचित्र किंवा वेगळं वागत असेल तर ते कोणा तिसऱ्या व्यक्तीमुळे होऊ शकते. अशावेळी ऑफिसमध्ये जास्त काम असल्याचा आव लोक आणतात. ते बाहेर जास्त वेळ घालवू लागतात आणि तुमच्यासाठी त्यांना वेळच मिळत नसेल, तर काही गडबड आहे असं समजा.
5) जिव्हाळा नसणे : वैवाहिक नात्यात शारीरिक जवळीक सर्वात महत्त्वाची असते. जर तुमच्या नात्यात तसं होत नसेल, तर सावध राहा. जर तुमच्या जोडीदाराचा स्पर्श आवडत नसेल किंवा तुमच्याबद्दल त्याला काहीही वाटत नसेल, तर ते तुमच्यासाठी एक मोठं लक्षण ठरू शकतं.