क्रेग हॅगी असं या व्यक्तीचं नाव आहे. जो यूकेतील लिस्कीर्ड इथं राहतो. 36 वर्षीय क्रेगला भूक लागली होती आणि तो बर्गर खाण्यासाठी घराबाहेर पडला. बर्गर खाऊन झाल्यानंतर त्याने वाटेत एक राष्ट्रीय लॉटरी स्क्रॅचकार्ड विकत घेतलं.
क्रेग म्हणाला की त्याने हे कार्ड फक्त मनोरंजनासाठी खरेदी केलं होतं आणि त्याला कोणत्याही बक्षीसाची अपेक्षा नव्हती. तरी त्याने ते कार्ड कुठे हरवू नये म्हणून सुरुवातीला शरीरावर चिकटवून ठेवलं. निघालं तेव्हा ते त्याने किचनमध्ये एका सॉसपॅनंध्ये लपवून ठेवलं.
advertisement
बापरे! पर्यटक काय पोलीसही घाबरून पळू लागले, ताजमहलमध्ये असं काय घडलं? Watch Video
जेव्हा रिझल्ट्स लागला तेव्हा क्रेगला विश्वासच बसेना. त्याने 10 लाख पाऊंड म्हणजेच 11 कोटी 26 लाख रुपयांची लॉटरी जिंकली होती. जेव्हा क्रेगने त्याच्या पत्नीला याबद्दल सांगितलं तेव्हा तिलाही विश्वास बसला नाही. आता पती-पत्नी पैशांचं काय करायच याचं प्लॅनिंग करण्यात बिझी आहेत. त्याची पत्नी भविष्यासाठी गुंतवणूक करू इच्छिते, तर क्रेग फक्त मनोरंजनासाठी काही पैसे खर्च करू इच्छितो.
अशा विचित्र पद्धतीने लॉटरी जिंकण्याचं हे पहिलं प्रकरण नाही. याआधीही अशी काही प्रकरणं समोर आली आहेत. कुणी चालता चालता, कुणी कामावरून घरी परतताना, कुणी काही दुकानात आणायला गेलं तेव्हा टाइमपास म्हणून लॉटरीचं तिकीट काढलं आणि ते जिंकलं, अशी काही प्रकरणं याआधीही आहेत.