हा आवाज जगातील सर्वात धोकादायक सापांपैकी एक असलेल्या रॅटलस्नेकचा आहे. वैज्ञानिकदृष्ट्या क्रोटलस म्हणून ओळखला जाणारा रॅटलस्नेक वाइपर कुटुंबातील आहे आणि जगभरात त्याच्या 36 पेक्षा जास्त प्रजाती आहेत, ज्यामध्ये डायमंडबॅकपासून साइडवाइंडरपर्यंतचा समावेश आहे. त्यांची त्वचा अशी आहे की त्यांना शोधणं कठीण होतं.
घराबाहेर खेळत होती मुलगी, तिला पाहताच घाबरली आई; हातात साप आणि खिशात तर...
advertisement
त्यांच्या आहारात उंदीर, ससे आणि पक्षी यांचा समावेश आहे. ते थर्मल सेन्सर्सद्वारे उष्णता ओळखून शिकार करतात. पण मानवांसाठी धोका म्हणजे त्यांचं विष. रॅटलस्नेक विष हे हेमोटॉक्सिन आणि न्यूरोटॉक्सिनचे मिश्रण आहे, जे ऊती नष्ट करतं. चावल्यानंतर लगेचच तीव्र वेदना, सूज आणि शरीर काळं होणं सुरू होतं. त्यानंतर रक्तस्त्राव सुरू होतो. श्वास घेण्यास त्रास होणं, स्नायू कमकुवत होणं, चक्कर येणं, उलट्या होणं ही लक्षणं दिसू लागतात. गंभीर प्रकरणांमध्ये किडनी निकामी होणं किंवा मृत्यू होऊ शकतो.
हा साप फक्त विषारीच नाही तर हुशार रक्षक देखील आहे. पण जर माणसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याचा चावा जीवघेणा ठरू शकतो. रॅटलस्नेकच्या शेपटीच्या टोकावर केराटिनसारखे भाग असतात जे सतत वाढत असतात. जेव्हा सापाला भीती वाटते किंवा धोका वाटतो तेव्हा ते स्नायूंच्या आकुंचनातून कंपन करतात आणि 90 डेसिबल पर्यंतचा मोठा आवाज निर्माण करतात. घंटा वाजवल्यासारखा हा आवाज. जो भक्षकांना दूर ठेवण्यासाठी असतो, हल्ला दर्शवण्यासाठी नाही. बहुतेक रॅटलस्नेक शांत असतात. प्रथम ते इशारा देतात आणि नंतर चावतात. पण जर तुम्ही जवळ गेलात तर तुमचं काही खरं नाही. ते दीड मीटर अंतरावरूनही तुमच्यावर हल्ला करतील.
सापांनी भरलेल्या विहिरीतील ते 54 तास! महिलेने असा वाचवला स्वतःचा जीव, सगळे शॉक
हे साप वाळवंट, गवताळ प्रदेश, जंगले आणि पर्वत अशा ठिकाणी राहतात. उत्तर, मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील शुष्क प्रदेशात आढळतो. अमेरिकेत कॅलिफोर्नियापासून टेक्सासपर्यंत त्यांचं वास्तव्य आहे. ते रात्री अॅक्टिव्ह असतात आणि दिवसा लपतात.
