TRENDING:

Breakup Story : ऐकावं ते नवल! WiFi मुळे कपलचं ब्रेकअप, नेमकी भानगड काय?

Last Updated:

Breakup Story : तरुणी मे महिन्याची सुट्टी म्हणून बॉयफ्रेंडसोबत एका हॉटेलमध्ये गेली. कपल हॉटेलमध्ये चेकइन करत होतं. तेव्हा तरुणीचा फोन हॉटेलच्या नेटवर्कशी आपोआप कनेक्ट झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीजिंग : कपलमध्ये काही ना काही कारणामुळे वाद, भांडणं होतात. हा वाद काही वेळा इतका टोकाला जातो की ब्रेकअपपर्यंत पोहोचतो. ब्रेकअपची काही कारणं इतकी विचित्र असतात की हसावं की रडावं तेच समजत नाही. असंच एक ब्रेकअपचं प्रकरण चर्चेत आलं आहे. तुम्हाला वाचूनच आश्चर्य वाटेल. चक्क वायफायमुळे एका कपलचं ब्रेकअप झालं आहे.
प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
advertisement

चीनमधील हे प्रकरण आहे. ली नावाची तरुणी मे महिन्याची सुट्टी म्हणून बॉयफ्रेंडसोबत चीनच्या चोंगकिंग येथील एका हॉटेलमध्ये गेली. कपल हॉटेलमध्ये चेकइन करत होतं. तेव्हा तरुणीचा फोन हॉटेलच्या नेटवर्कशी आपोआप कनेक्ट झाला. म्हणजे तिच्या फोनमध्ये हॉटेलचं वायफाय सुरू झालं.

सामान्यपणे वायफायला पासवर्ड असतो. तो टाकल्यानंतर वायफाय कनेक्ट होतो. वायफाय एकदा कनेक्ट केल्यानंतर पुन्हा पासवर्ड टाकायची गरज नसते, त्या वायफायच्या नेटवर्कमध्ये आल्यास तो आपोआप कनेक्ट होतो.

advertisement

बॉयफ्रेंडने घेतला संशय

तरुणीच्या मोबाईलमध्ये हॉटेलचा वायफाय आपोआप कनेक्ट झाला याचा अर्थ ती तिथं आधीही येऊन गेली होती. तिच्या बॉयफ्रेंडच्यासुद्धा ही बाब लक्षात आली. त्याने तिला ती दुसऱ्या कुणासोबत हॉटेलमध्ये आली होती का असं विचारलं. यावर तिनं आपण पहिल्यांदाच हॉटेलमध्ये आल्याचं सांगितलं. पण मग तिचा फोन आपोआप हॉटेलच्या वायफायशी कसा कनेक्ट झाला हे तिला समजावून सांगता आलं नाही.

advertisement

काय म्हणावं आता! 2 मुलांची आई तरुणीच्या प्रेमात पडली, लग्नासाठी हट्ट, पुढे घडलं असं...

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, हे कपल पहिल्यांदाच एकत्र हॉटेलमध्ये गेलं होतं. त्यामुळे बॉयफ्रेंडने तरुणी फसवणूक करत असल्याचा दावा केला. पण तरुणीने आपण यापूर्वी कधीही हॉटेलमध्ये आली नसल्याचं सांगितलं. नंतर दोघांमध्ये वादविवाद वाढत गेला आणि एके दिवशी तो ब्रेकअप करून तिला कायमचा सोडून गेला.

advertisement

नेमकं सत्य काय?

तरुणीने तिच्या फ्रेंड्सना याबद्दल सांगितलं. पण त्यांनाही ब्रेकअपचं कारण ऐकून विश्वास बसत नव्हता. लीनं आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करण्यासाठी वायफाय कनेक्शनमागील कारण शोधण्यास सुरुवात केली आणि हॉटेलकडून उत्तर मागितलं.

अरे देवा! सून म्हणून हे कुणाला आणलं, नवरीबाईचं खरं रूप समोर, सासर हादरलं

चौकशी केल्यानंतर, लीला आढळलं की चोंगकिंगमधील दुसऱ्या हॉटेलमध्ये जिथं ती काम करत होती, तिथं त्याच हॉटेलचं युझर नेम आणि पासवर्डसह वाय-फाय वापरत होते. एवढेच नाही तर लीने सत्य बाहेर काढण्यासाठी एका स्थानिक वृत्तवाहिनीशी संपर्क साधला.  आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे रिपोर्टरचा फोन देखील त्याच प्रकारे हॉटेलच्या वाय-फायशी आपोआप कनेक्ट झाला. यावरून हे सिद्ध झालं की ली जे बोलली ते खरं होतं. तिनं काही चुकीचं केलं नव्हतं, बॉयफ्रेंडची फसवणूक केली नव्हती.

advertisement

लीने नंतर तिच्या बॉयफ्रेंडशी संपर्क साधून परिस्थिती समजावून सांगितली, परंतु त्याने तिच्याशी बोलण्यास नकार दिला आणि चॅट अॅपवरील तिचं अकाऊंटडिलीट केले.

मराठी बातम्या/Viral/
Breakup Story : ऐकावं ते नवल! WiFi मुळे कपलचं ब्रेकअप, नेमकी भानगड काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल